मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘नवरी मिळे…’ फेम अभिनेत्याने सुरू केला नवा व्यवसाय, क्लाऊड किचन ते मोठं हॉटेल; म्हणाला, “स्वामींच्या कृपेने…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 30, 2025 | 1:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Limaye Starts New Business

'नवरी मिळे...' फेम अभिनेत्याने सुरू केला नवा व्यवसाय

Prasad Limaye Starts New Business: कलाकार मंडळी अभिनयासोबतच त्यांच्या आवडीनिवडी देखील जोपासताना दिसतात. बरीचशी कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या आवडीबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही कार्यरत असतात. असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाबरोबरच व्यावसायिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता प्रसाद लिमयेने गेल्या वर्षीच ‘अन्नपूर्णा क्लाऊड किचन आणि कॅटरिंग सर्व्हिस’ सुरू केलं होतं. अशातच त्याच्या या क्लाऊड किचनचं रुपांतर मोठ्या हॉटेलमध्ये झालं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा: कन्नड सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, अभिनय सोडण्यास कुटुंबाकडून होता दबाव, नेमकं प्रकरण काय?

प्रसाद लिमये पोस्ट शेअर करत म्हणाला, एक-दिड वर्षांपूर्वी मी अन्नपूर्णा क्लाऊड किचन सुरू केलं होतं. त्याला खूप प्रेम मिळालं, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मिळाले. आता मला सांगताना खरंच खूप आनंद होतं आहे. आज स्वामींच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आपलं ‘अन्नपूर्णा आता नव्या रुपात तुमच्यासमोर येत आहे. अन्नपूर्णाची ठाण्यातील सगळ्यात पहिली डाइन इन ची फ्रँचायझी ‘कोल्हापुरी झणका’ या ब्रँडने घेतली आहे. एवढे महिने खूप जणांचे मेसेज यायचे की, आम्हाला संपूर्ण कुटुंबाला तुमच्या इथे जेवायला यायचं आहे पण तेव्हा जागा उपलब्ध नव्हती. कारण, आधी हा व्यवसाय मी छोट्या प्रमाणात सुरू केला होता. पण, आज मला हे सांगताना खूप आनंद होत आहे. आता तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन आमच्या अन्नपूर्णामध्ये पोटभर जेवायला नक्की या. हे आऊटलेट ठाण्यातील कोलशेत इथे सुरू झालं आहे.” अशी पोस्ट शेअर करत प्रसादने माहिती दिली आहे. (Prasad Limaye Starts New Business)

View this post on Instagram

A post shared by Prasadd Kiran Liimaye प्रसाद किरण लिमये (@prasaddliimaye05)

दरम्यान प्रसाद लिमयेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी कंमेंट करत नव्या व्यवसायासाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता प्रसाद लिमयेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’नंतर तो बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकला. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसंच ‘बेधडक’, ‘What’s up लग्न’, ‘मोगरा फुलला’, ‘फतेशिकस्त’ या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. (Prasad Limaye Starts New Business)

आणखी वाचा: “माझा मुलगा विभक्त झाला आहे”, हेमलता बाणे प्रकरणावर अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “आमचा संबंध नाही त्यामुळे…”

Tags: entertainmentmarathi actorNavri Mile Hilerla Marathi SerialPrasad LimayePrasad Limaye Shared Goodnews
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Rashmika and vijay Wedding Date

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच विवाहबंधनात अडकणार; 'या' दिवशी आणि 'या' ठिकाणी होणार लग्नसोहळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.