शुक्रवार, ऑगस्ट 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच विवाहबंधनात अडकणार; ‘या’ दिवशी आणि ‘या’ ठिकाणी होणार लग्नसोहळा

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 31, 2025 | 11:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rashmika and vijay Wedding Date

रश्मिका–विजयच्या लग्नाची चर्चा

Rashmika and vijay Wedding Date : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखले जाणारे अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच वैवाहिक आयुष्यात पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या काही काळापासून दोघांच्या नात्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता त्यांच्या लग्नासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात हैदराबाद येथे विजय देवरकोंडाच्या घरी रश्मिका आणि विजय यांचा साखरपुडा पार पडला होता. हा साखरपुडा अत्यंत खासगी पद्धतीने, फक्त जवळच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या साखरपुड्याचे फोटो दोघांनीही अद्याप सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान दोघांच्या हातातील अंगठ्या पाहून चाहत्यांनी साखरपुड्याचा अंदाज बांधला होता.

आणखी वाचा – ‘नवरी मिळे…’ फेम अभिनेत्याने सुरू केला नवा व्यवसाय, क्लाऊड किचन ते मोठं हॉटेल; म्हणाला, “स्वामींच्या कृपेने…”

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

यापूर्वी विजय देवरकोंडाच्या टीमने माध्यमांना माहिती दिली होती की, रश्मिका आणि विजय यांचा साखरपुडा झाला असून ते २०२६ मध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहेत. आता याच संबधित आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, दोघे येत्या नवीन वर्षात विवाहबंधनात अडकणार आहेत.

आणखी वाचा – “माझा मुलगा विभक्त झाला आहे”, हेमलता बाणे प्रकरणावर अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “आमचा संबंध नाही त्यामुळे…”

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचं लग्न २६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडणार आहे. या खास सोहळ्यासाठी त्यांनी उदयपूरमधील एका भव्य आणि ऐतिहासिक राजवाड्याची (हेरिटेज प्रॉपर्टी) निवड केली आहे. साखरपुड्याप्रमाणेच लग्नसोहळाही अतिशय खासगी ठेवण्याचा त्यांचा विचार असून, या कार्यक्रमाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि अतिशय जवळचे मित्र उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, रश्मिका आणि विजय यांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीसुद्धा, सातत्याने समोर येणाऱ्या माहितीमुळे आणि सूत्रांकडून मिळालेल्या अपडेट्समुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Tags: Celebrity wedding newsRashmika and vijay Wedding DateSouth Indian celebrity wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
 Kuku kohli death
Entertainment

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

ऑगस्ट 26, 2026 | 11:12 am
paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Next Post
Screen time while eating risks

तुम्ही देखील जेवताना 'ही' चूक करत आहात का?, सोशल मीडिया तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतो घातक; सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.