लोकप्रिय मालिकांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेली मालिके म्हणजे झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका होय. मालिका जेव्हा पासून सुरु झालीय तेव्हापासूनच या मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलंय. या मालिकेतील राघव आणि आनंदीची जोडी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. गावाकडून मुंबईत येऊन आनंदीने कसा आपला संसार संभाळलाय, कशी माणसं जोडली आहेत हे पाहणं मालिकेत रंजक ठरतच आहे, (Nava Gadi Nav Rajya Promo)
शिवाय मालिकेत आलेल्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. अशातच राघव आणि आनंदी यांच्या नात्यात दुरावा आला आहे. राघव आणि आनंदी आता पुन्हा एकत्र कधी येणार याकडे आता साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या असताना लवकरच आनंदी आणि राघव एकत्र आलेलं दिसणार का याला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
पाहा आनंदी जाणार का राघवचा जीव वाचवायला (Nava Gadi Nav Rajya Promo)
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळत आहे की, आनंदी आणि राघव यांच्यात दुरावा हा कायम आहे. तर इकडे आनंदी वटपौर्णिमा साजरी करताना दिसतेय, तेव्हा आनंदी म्हणतेय की, आपल्यात कितीही दुरावा असाल तरी पती म्हणून सातजन्म हा तिला राघवच हवा आहे. वडाला फेऱ्या मारत असताना तितक्यात तिथे रमा धावत धावत येते आणि आनंदीला ओरडून सांगते की, राघवचा जीव धोक्यात आहे. (Nava Gadi Nav Rajya Promo)
हे देखील वाचा – मालिकेच्या सेटवर शूट सोडून timepass, bts व्हायरल
हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे राघवचा अपघात झालेला असतो आणि राघव त्या अपघातात रक्ताने माखलेला असतो आता राघवचा जीव आनंदी कसा वाचवणार? राघवसाठी आनंदी धावून जाणार का हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरणार आहे.
