सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांनी मला मारलं आणि…”, नाना पाटेकरांचा मार खालेल्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, आरोप करत म्हणाला, “त्यांच्याजवळ जाताच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 17, 2023 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nana Patekar Viral Video

"त्यांनी मला मारलं आणि…", नाना पाटेकरांचा मार खालेल्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, आरोप करत म्हणाला, "त्यांच्याजवळ जाताच…"

नाना पाटेकर यांनी एका इसमाला फटकावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नाना टीकेचे धनी झाले आहेत. चित्रीकरणादरम्यान एका इसमाला नानांनी जोरात कानशिलात लावली असल्याचा तो व्हिडीओ नेटकऱ्यांच्या तावडीत सापडला आहे. सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला रागाच्याभरात जोरदार टपली मारली. हा वाद भलताच चिघळला आणि नानांनी या व्हायरल व्हिडीओवरून स्पष्टीकरण देत आपलं मत मांडलं. (Nana Patekar Viral Video)

त्यानंतर एका मुलाखतीत नानांनी फटकावलेल्या त्या इसमाने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओ प्रकरणावरून तो मुलगा म्हणाला की, “माझं नाव राज सुनकर आहे. मी बनारसमधील तुलसीपूर इथे राहतो. मी आंघोळ करण्यासाठी गेलो होतो, पण त्यावेळी माझी नजर शूटिंगच्या ठिकाणी पडली. तिथे नाना पाटेकर होते. मी काही वेळ थांबून वाट पाहिली आणि नंतर त्यांच्याजवळ जाऊन फोटो मागितला. पण त्यांनी फोटो देण्यास नकार दिला आणि मला मारुन तिथून पळवलं”. त्या मुलाने पुढे सांगितलं, की मला सिनेमात कोणतीही भूमिका मिळाली नाही. त्यामुळे या घटनेनंतर माझ्या संपूर्ण परिसरात माझा अपमान झाला. मी मार खाल्ला आणि तिथून निघून गेलो”.

आणखी वाचा – Video : साधंच घर, नातेवाईकांची गर्दी अन्…; नवऱ्यासह सासरी पोहोचली क्रांती रेडकर, साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक, व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकरांचा मोठा चाहता असलेल्या या मुलाने सांगितलं असंही सांगितलं की, “मी नाना पाटेकरांचा मोठा चाहता आहे. ज्यावेळी मी त्यांना पाहिलं त्यावेळी मला आधी विश्वास बसत नव्हता. पण नंतर आणखी जवळ जाऊन पाहिल्यानंतर मला हे नाना पाटेकर असल्याचा विश्वास बसला. मी त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी जात असताना त्यांच्या सुरक्षारक्षकांनी मला थांबवलं होतं, पण मी त्यांचा मोठा फॅन आहे त्यामुळे मी न थांबता त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी पुढे गेलो. पण त्यांनी मला मारलं. या प्रकरणी कोणतीही कारवाई होऊ नये”.

आणखी वाचा – लग्नापूर्वी कुटुंबियांना अधिकाधिक वेळ देत आहे स्वानंदी टिकेकर, होणाऱ्या नवऱ्यासह जेवणाचा केला बेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नानांनी या व्हिडीओवरून स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, “या व्हिडीओमधील मुलगा नक्की कोण होता? हे मला माहित नव्हते. मला तो मुलगा आमच्याच टीममधला मुलगा वाटला आणि आम्ही आधी २ वेळा रिहर्सल केल्याप्रमाणे आणि दिग्दर्शकाने सांगितल्यानुसार मी त्याला कानाखाली मारली. पण ज्याला मारलं तो टीममधील नसून दुसराच कुणीतरी होता, हे मला नंतर कळलं. यानंतर मी त्याला शोधले पण तेवढ्यात तो तिथून पळून गेला होता आणि हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला असण्याची शक्यता आहे”.

Tags: entertainmentmarathi actornana patekarnana patekar viral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Supriya Pathare Hotel

Video : पुन्हा एकदा सुप्रिया पाठारेंच्या हॉटेलला टाळं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाल्या, “काही दिवसांसाठी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.