साऊथ सिनेसृष्टीवर वर्षानुवर्षे राज्य करत नागार्जुन नेहमीच चर्चेत असतो. नेहमीच काही ना काही शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. नागार्जुनचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. लोक त्याच्यावर खूप प्रेम करत असले तरी नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले असल्याचं समोर आलं आहे. नागार्जुन रविवारी २३ जून रोजी मुंबई विमानतळावर दिसला. अभिनेत्याबरोबर धनुष आणि त्याचा मुलगाही उपस्थित होता. यावेळी पापाराझीने तिघांनाही कॅमेऱ्यात कैद केले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला ज्यामुळे त्याचे चाहते संतप्त झाले. (Nagarjuna Akkineni apologised)
प्रत्यक्षात विमानतळावर एक वृद्ध चाहता नागार्जुनकडे आला तेव्हा त्याच्या सुरक्षा रक्षकाने त्याला धक्काबुक्की केली. सुरक्षा रक्षकाने ज्या पद्धतीने गार्डला धक्काबुक्की केली ते लोकांना आवडले नाही. त्याशिवाय, अभिनेत्याने तेथे आपल्या गार्डला काहीही सांगितले नाही, त्यामुळेही चाहते चिडले. दरम्यान, लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण काही लोकांनी त्याची बाजूही घेतली आणि अभिनेत्याने हे पाहिले नसल्याचे सांगितले. दाक्षिणात्य कलाकार त्यांच्या नम्र वागणुकीसाठी ओळखले जातात, त्याकरता त्यांचे कौतुकही होते, अशातच नागार्जुन यांच्या त्या व्हिडीओनंतर त्यांना ट्रोल करण्यात आले.
This just came to my notice … this shouldn’t have happened!!
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) June 23, 2024
I apologise to the gentleman 🙏and will take necessary precautions that it will not happen in the future !! https://t.co/d8bsIgxfI8
आता सुरक्षा रक्षकाने चाहत्याने ढकललेल्या व्हिडीओवर नागार्जुनने मौन सोडले आहे. विमानतळाचा व्हिडीओ पुन्हा शेअर करत अभिनेत्याने त्या चाहत्याची माफी मागितली आहे. त्याने असे लिहिले आहे की, “माझ्या नुकतंच लक्षात आले. हे घडायला नको होते. मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असे घडणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेईन”, असंही त्याने म्हटलं.
नागार्जुनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, पाच दशके चित्रपट जगतात राज्य करणारा हा सुपरस्टार शेवटचा ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसला होता. लवकरच तो ‘ना सामी रंगा’ या चित्रपटात दिसणार आहे. जो यावर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो.