शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाप म्हणून कमी पडल्याची अर्जुनला जाणीव, अमोलला एकट्यालाच सोडल्यामुळे कोसळलं रडू, अप्पी विचारला जाब

Saurabh Moreby Saurabh More
जून 25, 2024 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector serial update After leaving Amol alone in the garden Arjun realizes that he has failed as a father.

बाप म्हणून कमी पडल्याची अर्जुनला जाणीव, अमोलला एकट्यालाच सोडल्यामुळे कोसळलं रडू, अप्पी विचारला जाब

झी मराठी वाहिनीवरील सध्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका तुफान गाजत आहे. लीप घेतल्यापासून ही मालिका लोकप्रियतेच्या अव्वल स्थानावर आहे. सध्या या मालिकेत अर्जुन व अप्पी यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अर्जुन व अमोल यांची भेट कधी होणार? याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता अमोल हा आपलाच मुलगा असल्याचे अर्जुनला कळलं आहे. त्यामुळे मालिकेला आता आणखी रंजक वळण आलं आहे.

अशातच कालच्या भागात अर्जुनच्या सांगण्यावरुन सारसबागेत भेटायला बोलवतो. मात्र अर्जुन व अप्पी यांची भेट होऊ नये म्हणून आर्या तिच्या आईला बरं वाटत नसल्याचे नाटक करून अर्जुनला बोलवून घेते आणि अर्जुन आर्याच्या आईकडे जातोदेखील. इकडे अर्जुन आर्याच्या आईला बघण्यासाठी जातो आणि तिकडे अमोल त्याच्या बाबाची वाट बघत बसलेला असतो. त्याच्या या वाट बघण्यात संपूर्ण दिवस निघून जातो आणि रात्र होते. त्यानंतर अर्जुनला याच गोष्टीचा पश्चात्ताप होतो.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशातच झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अर्जुन अमोलची माफी मागताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो असं म्हणतो की,”तू इथे नसताना मी तुझ्यासाठी खेळणी आणली. पण देवाने जाणूनबुजून लहानपणी तुला तुझ्या आईकडे ठेवलं. माझ्याबरोबर नाही. माणूस जवळ असताना त्याची कदर करता येत नसेल तर या खेळण्यांवरच्या प्रेमाचं काय करायचं?”

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही सख्ख्या भावांची गैरहजेरी, भावांनीच दिलं स्पष्टीकरण , म्हणाला, “मला एक-दोन दिवस…”

यापुढे तो अमोलने काढलेले चित्र हातात घेत त्या चित्राकडे बघून असं म्हणतो की “अमोल बाळा मला माफ कर. मी तुला दिलेलं वचन पूर्ण नाही करु शकलो. तू तिकडे एकटा असशील हे माझ्या मनातही आलं नाही. तू उपाशी असशील, एकटा असशील? हे मला माहीतच नाही. एक बाप म्हणून मी आज कमी पडलो. आर्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याआधी मी अमोलला सांगायला पाहिजे होतं. मला माफ कर”. त्याचं हे बोलणं ऐकून आर्या येते आणि “माझी आई आजारी असताना मी एकटी पडली असते तर चाललं असतं का?” असं म्हणते.

आणखी वाचा – आता युद्ध पेटणार! राजाध्यक्ष कुटुंबाला नष्ट करण्यासाठी विरोचक तयार, देवी आईच्या लेकी वाचवणार का?

दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच त्यांना हा प्रोमो आवडल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता अर्जुन त्याची ही चूक सुधारेल का? अर्जुनच्या या वागण्यामुळे अप्पीचा राग तो कसा शांत करणार? हे आगामी भागातला पाहायला मिळेल.           

Tags: appi aamchi collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Sai Lokur Post

सई लोकूरच्या लेकीचा अन्नप्राशन सोहळा, परंपरा जपत सेलिब्रेट करत आहे प्रत्येक क्षण, घरातील सजावटीने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.