भारताची खाद्यसंस्कृती फार जुनी आणि संप्पन्न आहे. जगभरातील नागरिकांना भारतीय खाद्यसंस्कृतीचे फार आकर्षण आहे. अशातच नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवणारी झलक दाखवली आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला जात्यावर धान्य दळताना दिसत आहे. पारंपारिक जात्यावर एक महिला एका हाताने धान्य टाकत असून दुसऱ्या हाताने पीठ दळत आहे. गेल्या अनेक शतकांपासून भारतात स्वयंपाकघरामध्ये धान्य दळण्यासाठी पारंपारिक साधन म्हणून दगडाच्या जात्याचा वापर केला जात असे. अलॉन्ग यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी चक्क धान्य दळताना दिसत आहे. (Shilpa Shetty on atta chakki)
नागालँडचे मंत्री इम्ना अलॉन्ग हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. अलॉन्गना हा व्हिडीओ आवडला आणि आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत, “चक्की दा आटा, मक्के की रोटी, सरसों दा साग. वाह जी वाह!” असे कॅप्शन लिहिले. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली असून त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने म्हटले आहे की,” जात्यावर धान्य दळताना पाहून मला माझ्या आजीची आठवण आली” आणि “जात्यावरच्या दळलेल्या पिठाच्या पोळ्या स्वादिष्ट असतात.” असा दुसरा नेटकरी लिहितो.
Chakki da Aata, Makki ki Roti with Sarson da Saag…Waah ji Waah! 😋 pic.twitter.com/GIt4klkLxc
— Temjen Imna Along(Modi Ka Parivar) (@AlongImna) February 15, 2024
आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीने राजस्थानच्या प्रवासातील जात्यावरील धान्य दळतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हंटलं आहे की, “माझ्या नुकत्याच झालेल्या राजस्थान भेटीत, जेव्हा मी एक जाते पाहिली तेव्हा मला कळले की मला ते वापरून पाहायचे आहे आणि, अरे देवा! काय हा व्यायाम! जात्यावर धान्य दळण्यामुळे हात मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, पुनरुत्पादक अवयवांना चालना मिळते. पाठीच्या आणि हॅमस्ट्रिंग स्नायूंची लवचिकता वाढते. (तुम्ही प्रत्यक्ष जात्यावर काम केल्यानंतर तुम्हाला ते नियमितपणे वापरणाऱ्या लोकांबद्दल खूप आदर वाटतो.) जर तुम्हाला पाठदुखी असेल, स्लिप-डिस्कचा त्रास होत असेल आणि गर्भधारणेदरम्यान याचा वापर करणे टाळा. तुम्ही यापूर्वी कधी जात्यावर धान्य दळले आहे का?” असा प्रश्नदेखील विचारला.
भारतातील खाद्यसंस्कृतीशी निगडीत सर्व साधने आजही देशाच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये वापरली जातात. खेडोपाड्यांमध्ये असलेली जुनी पिढी आजही याचा साधनांचा वापर करुन अन्न शिजवत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पारंपारिक साधने नवीन पिढयांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होत आहे.