शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोव्यामध्ये फिरताना सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात, पायाला दुखापत झाल्यानंतर फोटोही केला शेअर, आता कशी परिस्थिती?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 31, 2024 | 12:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
arjun bijlani accident

गोव्यामध्ये फिरताना सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात, पायाला दुखापत झाल्यानंतर फोटोही केला शेअर, आता कशी परिस्थिती?

टेलिव्हिजनवरील ‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ या मालिकांमधून अभिनेता अर्जुन बिजलानी हा अभिनेता अधिक लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. त्याने उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती झाल्याची स्टोरी इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. त्यानंतर तो शस्त्रक्रिया करुन घरी परतल्याची पोस्टही त्याने शेअर केली होती. तसेच तो बरा होत असल्याचेही चाहत्यांना सांगितले. मात्र पुन्हा एकदा त्याच्याबद्दलची एक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्याचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. गोव्यामध्ये त्याचा अपघात झाल्याचे वृत्त हाती आले आहे. (arjun bijlani accident)

अर्जुन त्याची पत्नी नेहा स्वामी व मुलगा अयानबरोबर गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र तिथे अर्जुनचा अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे. सोशल मीडियामार्फत त्याने फोटो शेअर करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. दुखापत झालेली असतानाही तो नंतर ‘लाफ्टर शेफ’च्या शूटिंगसाठी मुंबईमध्ये पोहोचला आहे.

आणखी वाचा – “पाय वरती करुन झोपता, तुमचा माज अक्कल अन्…”, निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा घाणेरड्या शब्दांत अपमान, म्हणाली, “मोठ्या कलाकार असाल घरी…”

अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याला झालेल्या दुखापतीचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या पायाला खरचटले असून त्या ठिकाणी रक्तदेखील साखळल्यासारखे दिसत आहे. त्याच्याबरोबर हा प्रसंग कसा घडला? याबद्दल अधिक माहिती समोर आली नाही. पण तो कुटुंबासह गोव्यामध्ये त्यांचा वेळ घालवत होता. पायाला दुखापत झालेली असतानाही तो मुंबईमध्ये शूटिंगसाठी परतला आहे. त्याने सोशल मीडियावर ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवरुण काही व्हीडिओदेखील शेअर केले आहेत. यामध्ये सर्व भयंकर अवतारात दिसून येत आहेत.

आणखी वाचा – “लाली-पावडर लावली नाही तर भयानक ना…”, ऐश्वर्या नारकरांना दिसण्यावरुन हिणावल्यानंतर भडकल्या, म्हणाल्या, “अशी हुशारी…”

या आठवड्यात ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘स्त्री २’ च्या प्रमोशनसाठी येणार आहे. त्यामुळे यावेळी कार्यक्रमाची थीम हॉरर असणार आहे. निया शर्मा, अली गोनी यांना भयंकर अवतारात पाहिले गेले. श्रद्धाव्यतिरिक्त श्री अनिरुद्धाचार्यदेखील दिसणार आहेत. त्यामुळे या एपिसोडमध्ये नक्की काय बघायला मिळणार हे पाहण्यासारखे आहे.

Tags: accidentactingArjun bijlaniTv actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Bigg Boss Marathi ex contestant Utkarsh Shinde shared a post related to Nikki Tamboli and Varsha Usangavkar.

"आलिया भोगासी…", निक्कीने वर्षा उसगांवकरांची अक्कल, माज काढल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा टोला नक्की कोणाला?, पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.