Yogini Chauk Marathi Actress (Kamali): ‘कमळी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांना भरभरून प्रेम मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेत अभिनेत्री विजया बाबर आणि निखिल दामले यांची प्रमुख भूमिका असून या मालिकेतील आणखी एका भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि ती भूमिका म्हणजे कमळीची आई. अभिनेत्री योगिनी चौक या मालिकेत कमळीच्या आईची म्हणजेच सरोजाची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.
तर नुकतीच योगिनी चौकने ‘इट्स मज्जा’ च्या ‘ठाकुर विचारणार’ या सेगमेंटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवास सांगितला. यावेळी तिने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “कॉलेज संपल्यानंतर बाबांनी मला विचारलं तुला पुढे काय करायचं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला नाटक वगैरे करणं खूप आवडतंय. मग बाबांच्या सल्ल्याने मी अकॅडमी ऑफ थिएटर्समध्ये प्रवेश घेतला. इतकं सगळं छान आयुष्य झालं. त्यानंतर ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मध्ये सहभाग घेतला. तिथे महाराष्ट्र भरातून पाच हजार विद्यार्थी आले होते. त्यावेळी मुलींमधून मी पहिली आले आणि मुलांमधून निलेश साबळे पहिला आला. सुपरस्टार या शब्दाचा अर्थ ही माहित नव्हता तिला सुपरस्टार हे पद देण्यात आलं.” (Yogini Chauk Marathi Actress (Kamali)
पुढे योगिनी चौक म्हणाल्या, ” ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा शो जिंकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता माझं आयुष्य सेट झालं आहे. आता मला मागे वळून बघायची गरज नाही. पण यानंतर माझ्या स्वतःकडून अपेक्षा वाढत गेल्या. मला एकदा ऑडिशनसाठी फोन आला होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की, मी ऑडिशन देणार नाही, मी सुपरस्टार झाली आहे. इतक्या वेगाने माझ्या डोक्यात हवा गेली होती. माझ्याकडे तेव्हा एवढं यश आलं होतं ते मला पचवता आलं नाही, कारण ते कधी कोणी शिकवलंच नाही.” Yogini Chauk Marathi Actress (Kamali)



