अनेक मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. आजवर अनेक मराठी मालिकांमधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील भूमिकेचे त्याचे लाखो दिवाणे चाहते आहेत. या मालिकेनंतर शशांकला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळालेली पाहायला मिळाली. सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ही शशांक बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Sashank Ketkar Home Video)
विशेषतः सामाजिक मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य करण्यात शशांक नेहमीच अग्रेसर असतो. शिवाय फॅमिली बरोबरचे ही अनेक फोटो, व्हिडीओ तो चाहत्यांसह शेअर करताना दिसतो. अशातच शशांकने सुंदर अशा घराचा आणि घरातील बागेचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये शशांक व प्रियांकाचं सुंदर असं घर पाहायला मिळत आहे. हॉलमध्ये असलेल्या मोजक्याच आणि सुबक अशा वस्तूंनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सोफा, फर्निचर यांची सुबकता खूप असून लक्षवेधी ठरतेय. तर आकर्षक असं मॅट, आकर्षक असे रंगीत पडदे हे देखील लक्षवेधी ठरत आहेत.
शशांकने यावेळी त्याच्या घराच्या खिडकीत बनवलेल्या बागेचाही व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या घरातील ही बाग फुलझाडांनी सजवलेली पाहायला मिळत आहे. शिवाय सुंदर असं तुळशी वृंदावन ही त्या बागेत पाहायला मिळत आहे. आणि त्या तुळशी वृंदावनापुढे दिवा लावलेला ही पाहायला मिळत आहे. एकूणचं असे सुंदर असं घर शशांकच्या बायकोने खूपच छान ठेवलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शशांकच्या घराला पसंती दर्शवली आहे.
तर अनेकांनी त्याच्या घराचं कौतुक करत असे म्हटले आहे की, “खूप खूप छान घर आहे. घराच्या आतील सजावट, बाल्कनीतील कुंडीमधील फुलांची झाडे, आणि सर्वात महत्वाचे तुळशी वृंदावनात लावलेला दिवा खूप छान शशांक प्रियांका”, “खुप छान घर मस्त आहे. घरातल्या वस्तूची ठेवण खूप उत्तम आहे. हॉल खूप मस्त सजवला आहे आणि सगळ्यात भारी छोटंसं गार्डन त्यात असलेली झाड आणि महत्वाचे म्हणजे त्यात असलेल छोटंसं तुळशी वृंदावन घराला घरपण देणारं आहे”, अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत. शशांकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, शशांक मराठीसह हिंदी विश्वातही पाऊल टाकताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच तो या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला.