छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे पवित्र रिश्ता. या मालिकेतील मानव आणि अर्चनाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं होत. या मालिकेत अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत झळकले होते. या मालिकेदरम्यानच सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले. आज सुशांत आपल्यात नसला तरी त्याची आठवण आल्यावाचून राहत नाही. या मालिकेला आज १ वर्ष पूर्ण झालंय आणि त्यानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अंकिताने मालिकेतील फोटोंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.(Ankita Lokhande Troll)
मात्र या व्हिडीओतील एक गोष्ट सुशांतच्या चाहत्यांना खटकली आणि त्यावरूनच कमेंट बॉक्समध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. ती गोष्ट म्हणजे अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेबद्दलच्या व्हिडीओमध्ये सुशांतचा एकही फोटो लावला नाही. ‘सुशांतचे पण फोटो टाकले असते तर छान वाटलं असतं’, असं एका युजरने म्हटलंय.
म्हणून अंकितावर भडकले सुशांतचे चाहते (Ankita Lokhande Troll)
‘जर मानवला दाखवायचंच नव्हतं, तर पवित्र रिश्तासाठी पोस्टसुद्धा लिहायला पाहिजे नव्हती’, असा राग एकाने व्यक्त केला. पवित्र रिश्ता ही मालिका फक्त अर्चनाची नव्हती तर मानवचीही तेवढीच होती’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे. ‘तू स्वार्थी आहेस अंकिता लोखंडे’, ‘सुशांतला विसरलीस. तो नाही तर त्याचा एकही फोटो टाकला नाही. अंकिता, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.(Ankita Lokhande Troll)
अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतील तिच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे त्याखाली तिने कॅप्शन देखील दिल आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘पवित्र रिश्ता या मालिकेला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र आजही ही मालिका नवीकोरी वाटते. त्या सर्व गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. एकता कपूर तुमचेही आभार, कारण मी मालिकेत अर्चूची भूमिका साकारू शकेन असा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला. (Ankita Lokhande Troll)
हे देखील वाचा – सकाळी सहा वाजता अचानक रूमची बेल वाजली आणि…
अर्चना ही नवी ओळख मला दिल्याबद्दल धन्यवाद. कारण ज्या लोकांनी मालिका सुरू असताना माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, ती लोकं आज जेव्हा मला भेटतात किंवा बघतात तेव्हा त्यांच्या तोंडी अर्चू हेच नाव आधी येतं. हे नाव ऐकून मला खूपच भारी वाटतं. पवित्र रिश्ता ही मालिका ज्यांनी मनापासून पाहिली आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्यांचे खूप खूप आभार.’
