काही दिवसांपासून मुग्धा वैशंपायनच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं मृदुल हिचं नुकतंच लग्न पार पडलं. मागील आठवड्यापासून मुग्धाच्या बहिणीच्या लग्नाआधीच्या विधींच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर मुग्धाच्या बहिणीची जोरदार लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली. तिच्या बहिणीच्या लग्नातील फोटोही समोर आले आहेत. पारंपरिक अंदाजात नववधूवराच्या लूकने लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाची बहीण मृदुलच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Mugdha Vaishampayan Sister Wedding)
मुग्धा वैशंपायनच्या बहिणीच्या लग्नातील रिसेप्शनच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतेच मुग्धाची मोठी बहीण मृदुल व तिचे जिजू विश्वजीत यांचा रिसेप्शन लूक समोर आला आहे. मुग्धाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. आई वडील, मुग्धा व नवं जोडपं या फोटोत पाहायला मिळत असून त्यांच्या साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुग्धाने रिसेप्शनचे हे फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, तिच्या ताई व जिजला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुग्धाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या कुटुंबीयांचा पारंपरिक लूक विशेष भावतोय. तर नववधूच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांनी एकाच रंगाचे असे एकमेकांना साजेसे कपडे परिधान केले होते. याशिवाय मुग्धाचाही पारंपरिक लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अत्यंत साधेपणाने त्यांनी हे लग्न केलं आहे. दरम्यान या फोटोंमध्ये लग्नादरम्यानच्या विधींमध्ये मुग्धानेही सहभाग घेतलेला पाहायला मिळत आहे. तिच्या बहिणीच्या नवऱ्याचा कान पिळण्याचा विधी मुग्धाने पार पाडला आहे. मेहुणीच्या लग्नाला प्रथमेश लघाटेनेही हजेरी लावली होती. तर प्रथमेशने खास मेहुणीच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो देखील शेअर केला होता.