‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या रिऍलिटी शोमधून मुग्धा वैशंपायन घराघरांत पोहोचली. मुग्धाने तिच्या सुमधुर स्वरांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यानंतर अभिनेत्री चर्चेत आली ती म्हणजे तिच्या लग्नामुळे. मुग्धाने तिच्या सोशल मीडियावरुन ‘आमचं ठरलं’ म्हणत चाहत्यांसह तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली. मुग्धाने गायक प्रथमेश लघाटेबरोबरच्या नात्याचा खुलासा केला. त्यानंतर २१ डिसेंबरला ही जोडी अखेर लग्नबंधनात अडकली. (Mugdha Vaishampayan Story)
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी चिपळूण येथे थाटामाटात लग्न केलं. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश दोघांचाही सुखाचा संसार सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दोघंही त्यांच्या संसारात रमलेले पाहायला मिळत आहेत. इतकंच नव्हे तर, मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या कामालाही सुरुवात केली आहे. दोघंही गायनाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धा सध्या अलिबागच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहे. हा प्रवासादरम्यानचा व्हिडीओ शेअर करत, मुग्धाने “बऱ्याच दिवसांनंतर मी माझी बेबी एलिफंट(गाडी) चालवत आहे”. याखाली तळटीप देत तिने असं लिहिलं आहे की, “हा व्हिडीओ मी गाडी चालवताना शूट केला नाही, त्यामुळे काळजी नसावी”.
याचबरोबर मुग्धाने जेवणाच्या थाळीचा एक फोटोही शेअर केला आहे. यांत अगदी पंचपक्वान्न पाहायला मिळत आहेत. हा जेवणाचा फोटो शेअर करत मुग्धाने प्रथमेशला मिस करत असल्याचंही म्हटलं आहे. एकूणच मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओवरुन ती बरेच दिवसांनी ड्रायव्हिंग करत असल्याचं समोर आलं आहे. मुग्धा सोशल मीडियावरुन असे अनेक दैनंदिन जीवनातील अनेक व्हिडीओ शेअर करत असते.