शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अवाढव्य खर्च करणं टाळलं, साधेपणात लग्न केल्यानंतर मुग्धा व प्रथमेशवर कौतुकाचा वर्षाव, चिपळूणमध्येच जमले नातेवाईक व मित्र परिवार अन्…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2023 | 5:26 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
mugdha vaishampayan and prathamesh laghate wedding simple look photos viral on social media

अवाढव्य खर्च करणं टाळलं, साधेपणात लग्न केल्यानंतर मुग्धा व प्रथमेशवर कौतुकाचा वर्षाव, चिपळूणमध्येच जमले नातेवाईक व मित्र परिवार अन्…

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेले गायक व गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. गेले काही दिवस ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. मुग्धा-प्रथमेश हे गेले काही दिवस त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर लग्नाआधीच्या विधींचे खास फोटो शेअर करत होते. तेव्हा पासूनच हे दोघे कधी लग्न करणार अशी सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आणि अशातच या दोघांनी काल एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. काल (२१ डिसेंबर) रोजी मुग्धा-प्रथमेश यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. हा  लग्नसोहळा होताच त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटों व व्हिडीओमधील दोघांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने लग्नात पिवळ्या रंगाची हिरवा काठ असलेली साडी परिधान केली होती. तर प्रथमेशने लाल रंगाचा धोतर, सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचा शेला व पेशवाई स्टाईल पगडी परिधान केली होती. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Wedding)

मुग्धा-प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नात एकूण तीन लूक केले होते. एका लूकमध्ये मुग्धाने निळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती तर प्रथमेशनेही निळ्या रंगाचे सोवळे परिधान केले होते. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या लूकमध्ये पिवळ्या रंगाची साडी व प्रथमेशने धोतर सदरा व पुणेरी पगडी असा खास लूक केला होता. तसेच लग्नानंतरच्या  रिसेप्शनसाठी मुग्धा-प्रथमेश यांनी दोन खास लूक केले होते.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – रुपालीकडून अद्वैतनंतर आता नेत्रा-इंद्राणीच्या जीवाला धोका, मालिकेला नवं वळण, प्रेक्षकही चक्रावले

यापैकी रिसेप्शनच्या पहिल्या लूकसाठी मुग्धाने गुलाबी साडी व त्यावर साजेसा गोल्डन ब्लाऊज परिधान केला होता. तर प्रथमेशने ऑफ व्हाईट रंगाची शेरवाणी परिधान केली होती. तर रिसेप्शनच्या दुसऱ्या लूकसाठी मुग्धाने जांभळ्या रंगाची साडी व त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतला होता. तर प्रथमेशने आकाशी रंगाची शेरवाणी व त्यावर सोनेरी रंगाचा पायजमा परिधान केला होता.

आणखी वाचा – Video : बायकोची साडी नीट करत राहिला रोहित राऊत, पण व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना दिसले ५०० रुपये, म्हणाले, “नवऱ्याला…”

दरम्यान, मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे त्यांचा साधेपणा. मुग्धा-प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नात मोठा गाजावाजा किंवा अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधेपणाने लग्न केले होते. चिपळूणमधील मोठ्या लॉनमध्ये त्यांनी मोकळ्या मैदानात लग्नाचा मंडप टाकला होता. या मैदानात भव्य रांगोळी, आकर्षक सजावट, फुलांची आरास व विद्युत रोषणाई करत त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.             

Tags: entertainment newsMarathi newsmugdha vaishampayanprathamesh laghateprathamesh laghate and mugdha vaishampayan wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi actress prajkta mali shared photos with her family at her new farmhouse

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवरील वास्तुशांतीसाठी आजी-आजोबांची खास हजेरी, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, "अनेक अडचणी असूनही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.