‘आमचं ठरलं’ म्हणत एका कलाकार जोडीने त्यांच्या नात्याच्यी जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. ही जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायिका प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश यांच्या शाही विवाहसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. चिपळूण येथ डेस्टिनेशन वेडिंग करत या जोडीचा विवाहसोहळा संपन्न झाला. मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नामुळे विशेष चर्चेत राहिले. सध्या ही जोडी त्यांच्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
लग्नानंतर लगेचच या जोडीने कामाला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळालं. मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नानंतर बरेच एकत्र कार्यक्रम घेत गायनसेवा केली असल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरून दोघांनीही त्यांच्या या कार्यक्रमाचे अपडेट दिलेले पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच सध्या गायनसेवेसाठी मुग्धा व प्रथमेश उत्तरप्रदेश येथे पोहोचले असल्याचं समोर आलं आहे.

मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नानंतर प्रथमच गंगा मैयाचं दर्शन घेतलं असल्याचं सांगितलं. प.प श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची चातुर्मास स्थली, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महामंत्राची जन्मभूमी, दत्तपुराणाचे रचना स्थान, कानपूर उत्तरप्रदेशहून २३ किमीवर, गंगेच्या किनारी श्री क्षेत्र ब्रम्हावर्त येथे गायन सेवा सादर केली. याशिवाय दोघांनी कुटी मधे व दत्त मंदिरात दर्शन घेतलं आणि भक्तनिवासालाही भेट दिली.
मुग्धा व प्रथमेश यांनी गंगेच्या किनारी व अवतीभवतीच्या परिसराला भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. मुग्धा व प्रथमेश यांच्या आवाजाची जादू केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण भारतात पसरली आहे. महाराष्ट्राबाहेरही या दोघांचे चाहते आहेत. त्यामुळे ही जोडी बरेचदा चाहत्यांच्या प्रेमापोटी अनेक दौरे करताना पाहायला मिळते.