सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार बहीण-भावंडांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. या भावडांच्या जोड्यांपैकी प्रेक्षकांची लाडकी बहीणींची जोडी म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे व मृण्मयी देशपांडे. गौतमी व मृण्मयी या दोघीही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये दोघींचा समावेश आहे. गौतमी व मृण्मयी या सख्ख्या बहिणी असून दोघांमधील खास बॉंडिंग प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. दोघींनी सिनेविश्वात एकत्र काम केलं नसलं तरी सोशल मीडियावर त्या कायमच चर्चेत राहत असतात. दोघी सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mrunmayee and Gautami Deshpande fight)
अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये त्यांची मस्ती पाहायला मिळत आहे. दोघी बहीणींमधील ही मस्ती इतका टोकाला गेली आहे की, मृण्मयी ही मोठी बहीण गौतमीच्या अक्षरश: अंगावर बसलेली दिसत आहे. यावेळी त्यांच्या बाजूला गौतमीचा नवरा स्वानंदही बसलेला दिसत आहे आणि तो गौतमीला मृण्मयीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मृण्मयी त्याचेही न ऐकता गौतमीबरोबर भांडण करताना दिसत आहे.
आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तपासात मोठा खुलासा
गौतमी-मृण्मयी यांच्यातील हे भांडण इतकं टोकाला गेलं आहे की, गौतमी अक्षरश्: रडताना या व्हिडीओत दिसत आहे. मृण्मयीने गौतमीला चावल्यामुले ती रडत आहे आणि तिला मनवण्यासाठी मृण्मयी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओवर गौतमीने “My Sisters My Rules” असं म्हटलं आहे. शिवाय “चावरी सिस्टर” असा उल्लेखही तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केला आहे.
सोशल मीडियावर गौतमी व मृण्मयी दोघीही बऱ्यापैकी सक्रिय असतात. विशेषतः मृण्मयी गौतमीबरोबरचे अनेक रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. गौतमीला बहुतेकदा मृण्मयी त्रास देतानाचे व्हिडीओ शेअर करते. दोघींचे एकत्र अनेक रील व्हिडीओ पाहून नेटकरीही त्यांच्या व्हिडीओला पसंती दर्शवताना दिसतात. अशातच त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.