‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. तिने ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मनं बावरे’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. छोट्या पडद्यावरील तिच्या प्रत्येक भूमिका गाजल्या. मृणालने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, गेली दोन वर्ष मृणाल मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहे. २०१६ मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. तिला आता एक गोड मुलगीही आहे.
आई झाल्यानंतर मृणालने काही काळ कलाक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. ‘सुखांच्या सरींनी मन हे बावरे’ ही मृणालची शेवटची मालिका. या मालिकेनंतर मृणाल छोट्या पडद्यावर दिसलीच नाही. अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे व तिच्या लेकीचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच मृणाल नुकतीच भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर मृणाल प्रथमच तिच्या मूळगावी म्हणजेच नाशिकला गेली आहे. यासंबंधीत तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. “४ वर्षांनंतर, मी शेवटी माझ्या मूळ गावी परत आली आहे. माझं नाशिक. गोदाघाट.” असं म्हणत तिने नाशिकच्या गोदाघाटकिनारचे काही फोटोही शेअर केले आहेत.
दरम्यान, मृणालने २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली. नीरज व मृणाल हे दोघेही सध्या अमेरिकेमध्ये राहत आहेत. अमेरिकेतील टेक्सास प्रांतातल्या डल्लास या शहरात वास्तव्यास आहे. त्यानंतर आता ती भारतात परतल्यामुळे तिचे चाहते आनंदी झाले आहेत. तसेच अनेकांनी या फोटोखाली कमेंट्समध्ये तिचे भारतात परतल्याबद्दल स्वागतही केले आहे.