गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चार वर्षांनी नवऱ्यासह भारतात परतली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाशिकमध्ये स्वतःच्या गावीही गेली, आता दिसते अशी, म्हणाली, “माझं नाशिक…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 18, 2024 | 6:18 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Mrunal Dusanis returned to India with her husband after four years shared photos on social media

चार वर्षांनी नवऱ्यासह भारतात परतली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाशिकमध्ये स्वतःच्या गावीही गेली, आता दिसते अशी, म्हणाली, "माझं नाशिक..."

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. तिने ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मनं बावरे’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. छोट्या पडद्यावरील तिच्या प्रत्येक भूमिका गाजल्या. मृणालने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, गेली दोन वर्ष मृणाल मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहे. २०१६ मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. तिला आता एक गोड मुलगीही आहे.

आई झाल्यानंतर मृणालने काही काळ कलाक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. ‘सुखांच्या सरींनी मन हे बावरे’ ही मृणालची शेवटची मालिका. या मालिकेनंतर मृणाल छोट्या पडद्यावर दिसलीच नाही. अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे व तिच्या लेकीचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, तासभर रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होती अन्…; मृत्यूशी सुरु आहे झुंज, बहिणीने दिली माहिती

अशातच मृणाल नुकतीच भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर मृणाल प्रथमच तिच्या मूळगावी म्हणजेच नाशिकला गेली आहे. यासंबंधीत तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. “४ वर्षांनंतर, मी शेवटी माझ्या मूळ गावी परत आली आहे. माझं नाशिक. गोदाघाट.” असं म्हणत तिने नाशिकच्या गोदाघाटकिनारचे काही फोटोही शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Video : अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टमध्ये गेली रिंकू राजगुरु, गाणी ऐकून कार्यक्रमातच उड्या मारु लागली अन्…; म्हणाली, “खूपच भारी…”

दरम्यान, मृणालने २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली. नीरज व मृणाल हे दोघेही सध्या अमेरिकेमध्ये राहत आहेत. अमेरिकेतील टेक्सास प्रांतातल्या डल्लास या शहरात वास्तव्यास आहे. त्यानंतर आता ती भारतात परतल्यामुळे तिचे चाहते आनंदी झाले आहेत. तसेच अनेकांनी या फोटोखाली कमेंट्समध्ये तिचे भारतात परतल्याबद्दल स्वागतही केले आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsmrunal dusanis
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Suchitra Bandekar On Home Minister

'होम मिनिस्टर'मध्ये सुचित्रा बांदेकरांमुळे दिली जाते पैठणी, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, "जेव्हा फार पैसे हातात नव्हते तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.