बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘होम मिनिस्टर’मध्ये सुचित्रा बांदेकरांमुळे दिली जाते पैठणी, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, “जेव्हा फार पैसे हातात नव्हते तेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 18, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suchitra Bandekar On Home Minister

'होम मिनिस्टर'मध्ये सुचित्रा बांदेकरांमुळे दिली जाते पैठणी, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, "जेव्हा फार पैसे हातात नव्हते तेव्हा…"

आदेश बांदेकर यांच्या अभिनयाचे, सूत्रसंचालनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आदेश यांना महाराष्ट्राचे भावोजी या म्हणूनचं प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाद्वारे ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. सगळ्यांचे लाडके भावोजी आजवर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात प्रसिद्ध आहेत. इतकंच नव्हे तर प्रत्येक महिलेला आपल्या लाडक्या भावोजींनी घरी यावं असं वाटतं असतं. या कार्यक्रमामुळे आदेश यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियता आहे. (Suchitra Bandekar On Home Minister)

मराठी मनोरंजन सृष्टीतील आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर ही लोकप्रिय जोडी आहे. अभिनयशिवाय दोघेही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळेही नेहमीच चर्चेत असतात. ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून सर्वत्र दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. आदेश हे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचले आहेत. तर सुचित्रा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. दोघांनी त्यांच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. . आदेश व सुचित्रा यांच्या प्रेमाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात.

आणखी वाचा – “पाण्याचा नळ जरा चमकवा…”, ऐश्वर्या नारकरांनी घरातील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “तो नळ चमकवण्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)

सुचित्रा यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बरेच किस्से सांगितले. यावेळी बोलताना सुचित्रा यांनी आदेश यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातील पैठणीमागील किस्सा सांगितला आहे. सुचित्रा म्हणाल्या, “खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा फार पैसे हातात नसायचे. त्यावेळी आमच्या सोसायटीमधील सर्व बायकांनी ठरवलं होतं की, पैठणी विकत घ्यायची. आणि तेव्हा आदेशचा ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम नव्हता. आदेशच्या या कार्यक्रमाला आज २० वर्षे झाली. त्यापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी आम्ही सगळ्याजणी पैसे काढायचो आणि जिचा नंबर लागेल तिला ती पैठणी मिळायची. अशी पैठणीची भिशी आम्ही काढायचो. आणि तेव्हा ही गोष्ट आदेशाला मी सांगितली”.

आणखी वाचा – Video : अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टमध्ये गेली रिंकू राजगुरु, गाणी ऐकून कार्यक्रमातच उड्या मारु लागली अन्…; म्हणाली, “खूपच भारी…”

पुढे त्या म्हणाल्या, “तेव्हा तो म्हणाला, तुमच्यासाठी इतकी पैठणी महत्त्वाची आहे. हे त्याला जेव्हा कळलं त्यानंतर तो झी वाहिनीशी बोलला आणि त्याने त्यांनतर भेटवस्तू म्हणून या कार्यक्रमात पैठणी द्यायला सुरुवात केली. ज्या स्त्रियांसाठी पंधरा ते वीस हजाराची पैठणी घेणं कठीण असतं, त्यासाठी त्याने हा नवा उपक्रम सुरु केला. तर पैठणी देण्याचं क्रेडिट हे पूर्णतः माझं आहे”.

Tags: Aadesh Bandekarentertainmenthome ministersuchitra bandekarSuchitra Bandekar On Home Minister
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Bhau Kadam Wife Mangalsutra

भाऊ कदम यांनी शेअर केला पत्नीचा बदलता लूक, मोठ्या मंगळसूत्राने वेधलं सर्वाधिक लक्ष, डिझाइन आहे फारच सुंदर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.