मालिका कलाकारांच्या नावाला एक ओळख मिळूवन देतात. मालिकेलतील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. मोठ्या काळासाठी प्रेक्षक रोज त्या कलाकारांना बघत असतात.मालिकेच्या कथानकात प्रेक्षक इतके अडकतात की काही वेळाने विसर पडतो की ही मालिका आहे. मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली एक निरागस अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस.(Mrunal Birthday Celebration)
माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, असं सासर सुरेख बाई, सुखांच्या सरीने हे मन बावरे अशा अनेक मालिका केल्या. सहज,सुंदर अभिनयाने मृणालने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.छोट्या पडद्या प्रमाणे मोठया पडद्यावर देखील मृणालने तिच्या अभिनयाची छाप पडली. श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटात मृणाल झळकली होती.
पाहा कसा साजरा झाला मृणालचा वाढदिवस (Mrunal Birthday Celebration)
२० जूनला मृणालचा वाढदिवस असतो. वाढदिवस हा प्रत्येकासाठीच खास असतो.आणि आपल्या जवळच्या माणसाने आपल्यासाठी काही तरी खास करणं हे नक्कीच विशेष असत.मृणालने नुकतेच तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोज तिच्या इन्साग्राम अकाउंट शेअर केले आहेत. तिचा पती नीरज आणि मुलगी नुरवी यांच्या सोबत तिने वाढदिवस साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटो मध्ये सुंदर असा केक बघायला मिळतो आहे, आणि तो केक नीरजने स्वतः बनवला आहे. हे मृणालने दिलेल्या कॅप्शन मधून लक्षात येत आहे.
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार, तोंडाला पाणी येईल असा चीजकेक बनवल्याबद्दल धन्यवाद नीरज असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.(Mrunal Birthday Celebration)

हे देखील वाचा : “अहो कुठे गेले तुम्ही..”,प्रेक्षक करतायत मृणालला मिस
२०१६ साली नीरज मोरे सोबत मृणालने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर मृणालने असं सासर सुरेख बाई ही एकच मालिका केली आणि त्यांनतर सध्या ती अमेरिकेत स्थित आहे.२०२२ मध्ये मृणाल गोंडस मुलगी झाली.सध्या मृणाल नुरवी च्या संगोपनात व्यस्त असून सिनेसृष्टीपासून लांब असल्याचं पाहायला मिळत.सध्या ती तिच्या कुटुंबिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेताना पाहायला मिळते,