असा नट होणे नाही हे वाक्य अधोरेखित करणारी व्यक्ती म्हणजे दिग्गज अभिनेते अशोक सराफ. उत्कृष्ट अभिनयशैली, विनोदाचं अचूक टायमिंग, हटके बोलीभाशा यांत अशोक मामांचा हात कुणीही धरू शकत नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कित्येक कलाकार मंडळी हे मामांच्या अभिनयापासून प्रेरित आहेत. गेली कित्येक वर्षे अशोक मामांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय आणि त्यांच्या मनात स्वतःच हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कलाकार म्हणून अशोक सराफ हे सर्वांनाच माहित आहेत तर माणूस म्हणूनही ते उत्तम आहेत, याची प्रचिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून नेहमीच ऐकायला मिळते.(Ashok saraf Shares Incident)
एक कलाकार म्हणून अशोक मामांना त्यांच्या कामाप्रती निष्ठा, आदर प्रचंड आहे याबाबतच एक किस्सा मामांनी त्यांच्या मी बहुरूप या पुस्तकात मांडला आहे, चला तर पाहूया नेमका काय आहे तो किस्सा. कामाची सुरुवातच मामांनी नाटकांपासून केली. नाटक हे जीव की प्राण असणाऱ्या मामांनी त्याचा अपमान होईल अशी कोणतीच गोष्ट कधीही केली नाही आणि कोणाकडून घडत असताना करू ही दिली नाही. कलाकार म्हणून मामांवर आजही चाहते प्रेम करतात. भारतातच नव्हे तर परदेशात ही मामांचे फॅन्स आहेत. अशीच एक फॅन मुमेंट घडली होती दुबई येथे.
पाहा भर प्रयोगात काय घडला चमत्कार (Ashok saraf Shares Incident)
याबाबतचा एक किस्सा सांगत मामा म्हणाले आहेत की, २०१९- २०ची गोष्ट. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुबईला आमचा प्रयोग होता. आम्ही विमानतळावर उतरलो आणि तिथे वाळूचं वादळ सुरू झालं. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत घशात वाळूचे कण जाऊन माझा आवाज पार बसला होता. तोंडातून शब्दच फुटेना. मी प्रचंड घाबरलो. निर्माता आला, डॉक्टर आले. त्यांनी औषध दिलं, पण काहीही उपयोग झाला नाही. त्यात रात्री प्रयोग होता.(Ashok saraf Shares Incident)
प्रयोग सुरू करण्यापूर्वी मला प्रेक्षकांशी बोलायचं आहे, असं मी निर्मात्याला सांगितलं. त्यानंतर मामा रंगमंचावर जाऊन प्रेक्षकांसमोर उभे राहिले आणि म्हणाले, ‘माझा आवाज हा असा झालाय. मला माफ करा’ असं मी त्यांना न फुटणाऱ्या आवाजात म्हटलं. दरम्यान प्रेक्षकांना मामांची परिस्थिती कळाली, ‘आम्हाला चालेल.’ असा प्रेक्षकांमधून प्रतिसाद आला.
आणि प्रेक्षकांच्या प्रेमापोटी मामांनी नाटक करायला सुरुवात केली. याब्ब्दल बोलताना मामा म्हणाले, माझी एन्ट्री आली. मी स्टेजवर गेलो. आणि काय आश्चर्य! पहिल्या दोन वाक्यांत माझा आवाज सुटला. आपोआप ! त्या उपरवाल्याचेच आभार. आणि रंगदेवतेचे.
हे देखील वाचा – तीर्थयात्रेला न जाता निवेदिता पोहचल्या लंडनला
एकतर कामाप्रतीची निष्ठा आणि चाहत्यांचा आशीर्वाद आणि प्रेम या गोष्टींमुळे मामांच्या या नाटकाचा प्रयोग दुबई येथे यशस्वी झाला. त्यामुळे पुन्हा पुन्हा असं म्हणणं योग्य ठरेल की असा नट होणे नाही.