टेलिव्हिजनवरिल सासू सूनांच्या जोड्या या नेहमी चर्चेत असतात.तर याचप्रमाणे कलाकारांच्या रिअल लाईफ सासू सूनांच्या जोड्यांना देखील पसंती मिळते.तर अश्यातच सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे शिवानी रांगोळे आणि मृणाल कुलकर्णी.(Shivani Rangole )
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं आहे. गेली अनेक वर्ष शिवानी आणि विराजस यांची मैत्री होती आणि अखेर त्यांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. त्यामुळे शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांचीदेखील अत्यंत लाडकी आहे.शिवानीच्या कामाचंही मृणाल भरभरून कौतुक करताना दिसते.आता त्यांनी शिवानीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून शिवानी बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते. मुख्य म्हणजे या मालिकेत ती अक्षरा ही मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळतेय. शिवानीच्या या आनांदात सध्या संपूर्ण कुटुंब सहभागी होत आहे. तर असच तिच्या कामाचं कौतुक करत आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देत मृणाल कुलकर्णी यांनी एक खास पोस्ट केली.(Shivani Rangole )
====
हे देखील वाचा :आईच्या निधनांनंतर माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने भावूक, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
====
मृणाल यांनी शिवानीने शेअर केलेली एक पोस्ट रिपोस्ट करत, प्रिय शिवानी रांगोळे, तुझ्या नवीन मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ! तुला ‘अक्षरा ‘च्या भूमिकेत बघायला उत्सुक आहोत ! मला खात्री आहे तू धमाल उडवून देशील पण धडे मालिकेतल्या सासूला आणि नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं !!!!असं म्हणत त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्यात.तर तिच्या या पोस्टवर देखील अनेक चाहत्यांनी देखील त्यांच्या या पोस्टवर शिवानीला शुभेच्छा दिल्या आहेत.(Shivani Rangole )
या मालिकेच्या निमित्ताने हृषीकेश शेलार आणि शिवानी रांगोळेसोबत कविता लाड देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यासोबत शिवानी लवकरच फक्त महिलांसाठी या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल ही आठ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.