आजकाल ओटीटी वेबसीरिज बघण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. ओटीटीवर नेहमी वेगवेगळे विषय हातळताना दिसतात. अनेक वेबसीरिजना मोठ्या प्रमाणात लोकप्रियतादेखील मिळाल्याचे पाहिल्याचे मिळते. अशातच आता ज्या वेबसीरिजचे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते ती वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिर्झापुर’ या वेबसीरिजने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या वेबसीरिजच्या पाहिल्या व दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Mirzapur 3 trailer)
‘मिर्झापुर ३’चा प्रेक्षक खूप कालावधीपासून वाट बघत होते. नवीन भाग ५ जुलै रोजी ॲमेजॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडला आहे. या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, रासिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा असे कलाकार दिसून येत आहेत. या ट्रेलरमध्ये कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. पंकज त्रिपाठीच्या अभिनयामुळे सर्वांचा उत्साह वाढवला आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉगदेखील पहायला मिळाले आहेत.
अली फजल यावेळी रुद्र रुपात दिसून येत आहे. तसेच ईशा तलवार व अंजुम शर्मा यांचाही जबरदस्त अभिनय पाहायाल मिळणार आहे. रसिका दुग्गलच्या भूमिकेमध्येही यावेळी बदल झालेले दिसणार असून तिच्यामुळेही सीरिजमध्ये ट्विस्ट येताना दिसणार आहेत. तसेच रसिकाचा मुलगादेखील असणार आहे. त्यामुळे आता या सीरिजमध्ये नक्की काय होणार? हे पाहाण्यासारखे आहे.
मिर्झापुरच्या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र नवीन भागामध्ये मुन्ना भय्या ही भूमिका पाहायला मिळणार नाही. ही भूमिका दिव्येन्दू शर्माने साकारली होती. दुसऱ्या भागामध्ये त्याचा मृत्यू झालेला दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता सत्ता नक्की कोणाच्या हातात जाणार हे पाहाण्यासारखे आहे.
या नवीन भागात पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी, ईशा तलवार, अंजुम शर्मा असे कलाकार दिसून येणार आहेत.