प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्वच वाहिन्या वेगवेगळे विषय आणत असतात. या स्पर्धेत मनोरंजनाच्या शिखरावर राहणारे शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस मराठी असो वा हिंदी असो यामध्ये येणारे सदस्य त्यांच्या दमदार खेळाच्या जोरावर प्रेक्षकांना आकर्षित करतात. काही सदस्यांच्या मागील आयुष्यातील गोष्टी त्यांना बाळ देतात तर काहींचं मनोबल कमी करतात. एक मेकांवर होणारे आरोप त्यावर केले जाणारे प्रत्यारोप हे पाहणं रंजक ठरत. काहींच्या जीवनाचा संघर्ष प्रेक्षकांना भावुक करतो. (shiv thakare)
बिग बॉस या लोकप्रिय शो मध्ये अमरावतीचा एक सामान्य माणूस शिव ठाकरे सध्या याच शोचा एक भाग आहे. हिंदी बिग बॉस च्या १६ व्या सिझन मध्ये शिव ठाकरे मुत्सद्दी खेळ खेळून प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या सिझन चे टॉप ६ आता जाहीर झाले असून शिव ही या यादीत सामील आहे. येत्या शनिवारी बिग बॉस हिंदी सिझन १६चा महाअंतिम सोहळा आहे.(shiv thakare)
====
हे देखील वाचा – ‘दौलतराव’ दिसणारं नव्या भूमिकेत अभिनेता हृषीकेश शेलारची नवीन मालिका
====
या खेळात झालेली मैत्री नेहमी चर्चेचा विषय ठरली आहे. बिग बॉस मराठी मधील शिव ठाकरे आणि वीणा जगताप हि जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली दिसली तसेच या दोघ्यांच्या रिलेशन बद्दल ही सकारातमक चर्चा दिसून आली. मराठी बिग बॉस दरम्यान एका टास्क मध्ये शिव ने वीणाच्या नावाचा टॅटू आपल्या हातावर काढला होता.
बिग बॉस मध्ये प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी हजेरी लावली होती, तेव्हा एका टास्क दरम्यान अनुपम यांनी शिवच्या हातावर वीणा हा टॅटू बघून शिव ला विचारलं ‘ इतकी आठवण येत आहे वीणा ची?’ त्यावर हो खूप असं उत्तर देत शिव ने वीणाची खूप आठवण येत असल्याचं सांगितलं. शिव चा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होताना दिसतोय. शिव वीणा च्या चाहत्यांना हे ऐकूनखूप आनंद झाल्याचा दिसून येत आहे.(shiv thakare)
तर काही दिवसांपूर्वी वीणा ने सुद्दा शिवला पाठिंबा दर्शवत पोस्ट केली होती.या पर्वाचा विजेता मराठमोळा शिव होणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.