गुलाबाची कळी बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. या अभिनेत्रीने कायमच आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. निरनिराळ्या भूमिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त निर्मिती क्षेत्र व विविध व्यायसायिक क्षेत्रातही तेजस्विनी कार्यरत आहे. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Tejaswini Pandit Home)
दिवाळीनिमित्त तेजस्विनीने काढलेले खास फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.यंदाची दिवाळी तेजस्विनीने दणक्यात साजरी केलेली पाहायला मिळतेय. पारंपरिक अंदाजात काढलेले फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. अशातच या फोटोंमधील आणखी एक आकर्षणाची बाब म्हणजे तेजस्विनीचं घर. तेजस्विनीनेने दिवाळीनिमित काढलेल्या फोटोंमध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये तेजस्विनी तिच्या कुटुंबीयांबरोबर पाहायला मिळतेय. यांत तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबीयांचा पारंपरिक लूक पाहायला मिळतोय. दिवे हातात घेऊन तेजस्विनी व तिच्या बहिणीने फोटो काढले आहेत. या फोटोंमधील तेजस्विनीच्या घराने लक्ष वेधून घेतलं आहे. तेजस्विनीच्या घराचं आकर्षक असं इंटेरियर असून घराला दिलेल्या पारंपरिक टचने घराचं सौंदर्य खुलून आलं आहे. तेजस्विनीच्या या घरात सुंदर अशी स्वामींची तशीच विठूरायाची मूर्ती पाहायला मिळाली. दिवाळीनिमित्त घरात केलेल्या रोषणाईने घर लख्ख उजळून निघालं आहे.
तेजस्विनीचा पारंपरिक लूकही लक्षवेधी ठरत असून तिच्या घराचं इंटेरियर भाव खाऊन गेलं आहे. आई, बहीण व स्वतः तेजस्विनी यांनी एकत्र दिवाळी साजरी केली असून तेजस्विनीच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. तेजस्विनीने ‘बांबू’ या चित्रपटाची निर्मिती केली असून तो तिचा निर्मित केलेला पहिला सिनेमा आहे. तसेच ‘अथांग’ या वेबसीरिजची निर्मितीही तिने केली आहे. ‘तू ही रे’,’येरे येरे पैसा’,’अगं बाई अरेच्चा’, ‘फॉरेनची पाटलीण’ अशा अनेक सिनेमांत तेजस्विनी पंडीतची झलक पाहायला मिळाली.