बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाव व ओळखीचा गैरवापर, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संताप, थेट हायकोर्टाची धाव घेतली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 5, 2026 | 4:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood News

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संताप

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक विवेक ओबेरॉय यांनी त्यांच्या नावाचा, फोटोचा आणि ओळखीचा गैरवापर होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत दिल्ली हायकोर्टात महत्त्वाची याचिका दाखल केली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या फेक अकाउंट्स, डीपफेक व्हिडीओ आणि बेकायदेशीर व्यावसायिक वापराविरोधात त्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. त्यांचा दावा आहे की अनेक अज्ञात लोक सोशल मीडियावर त्यांच्या नावाने बनावट अकाउंट्स चालवत असून त्यांच्या फोटो, आवाज आणि ओळखीचा गैरवापर करत आहेत.

फेक अकाउंट्सपासून बेकायदेशीर विक्रीपर्यंतचा प्रकार विवेक ओबेरॉय यांनी कोर्टात सांगितलं की काही लोक त्यांच्या ओळखीचा वापर करून परवानगीशिवाय वस्तू विकत आहेत. तर काही ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या प्रतिमा चुकीच्या आणि आक्षेपार्ह पद्धतीने सादर केल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे. व्हिडीओ आणि विविध पोस्ट्सद्वारे त्यांची बदनामी केली जात असल्याचंही विवेक यांनी याचिकेत नमूद केलं आहे. या प्रकारचं कंटेंट केवळ दिशाभूल करणारंच नाही, तर अपमानजनक आणि मानहानीकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही जण त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत व्यावसायिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप आहे.

आणखी वाचा – अनुश्रीचा रुचितावर संताप, ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पेटला वाद, विशालच्या टोळीमध्ये फूट पडणार अन्…

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

नाव आणि ओळखीवर पहिला हक्क स्वतःचाच असतो असं याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे. कोणत्याही कलाकार किंवा सार्वजनिक व्यक्तीच्या नावावर, प्रतिमेवर आणि ओळखीवर सर्वात पहिला अधिकार त्या व्यक्तीचाच असतो. त्याच्या संमतीशिवाय त्याचा कोणताही व्यावसायिक वापर करणं कायद्याने चुकीचं असून त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा धोक्यात येते. महत्त्वाचं म्हणजे याआधीही दिल्ली हायकोर्टने पवन कल्याण, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अभिनेता आर. माधवन, एनटीआर ज्युनियर आणि सलमान खान यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या पर्सनॅलिटी राइट्सचे संरक्षण केले आहे.

आणखी वाचा – “उदरनिर्वाह होईल एवढेही पैसे मिळत नाहीत”, मराठमोळ्या गायकाचा मिळणाऱ्या मानधनाबाबत खुलासा, म्हणाला, “आमचं शोषण…”

Tags: bollywood newsentertainment newsVivek oberoi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Shawarma Girl Ekta Sawant

परप्रांतीयांनी बंद पाडला मराठी तरुणीचा व्यवसाय, अखेर शोरमा गर्लला मिळाला हक्काचा स्टॉल, वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.