मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परप्रांतीयांनी बंद पाडला मराठी तरुणीचा व्यवसाय, अखेर शोरमा गर्लला मिळाला हक्काचा स्टॉल, वाचा सविस्तर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 5, 2026 | 5:07 pm
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
Shawarma Girl Ekta Sawant

अखेर मराठी तरुणीचा व्यवसाय पुन्हा सुरु, डोंबिवलीतील शोरमा गर्लला मनसेकडून हक्काचा स्टॉल

Shawarma Girl Ekta Sawant : मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असं आपण अनेकदा ऐकतो. पण हे कितपत सत्य आहे? मराठी माणसाची ओळख नेहमीच नोकरी करणारा, सुरक्षिततेला प्राधान्य देणारा अशी करून दिली गेली. शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा आणि आयुष्य स्थिर ठेवा हा विचार आपल्या मराठी माणसांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या रुजत गेला. त्यामुळे जोखीम पत्करणारा व्यवसाय हा पर्याय अनेकदा मागे पडला. पण याचा अर्थ असा होत नाही की मराठी माणसात व्यवसाय करण्याची क्षमता नाही. पण हा समज डोंबिवलीतील एक मराठी तरुणीने खोटा ठरवत स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला. ती तरुणी म्हणजे एकता सावंत. बुधवारी मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या हस्ते डोंबिवलीतील शोरमा स्टॉल पुन्हा त्याच ठिकाणी सुरू करण्यात आला.

आणखी वाचा: नाव व ओळखीचा गैरवापर, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संताप, थेट हायकोर्टाची धाव घेतली अन्…

काही काळापूर्वी एकता सावंत या मराठी तरुणीला आपला व्यवसाय करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मागच्या काही पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात एकता सावंत हिने शोरमाची हातगाडी लावली होती. मात्र ही गाडी नियमबाह्यपणे लावली म्हणून पालिकेच्या पथकाने यावर कारवाई करून तिथे व्यवसाय करण्यास विरोध केला. पण या मराठी तरुणीच्या व्यवसायासाठी मनसेचे अविनाश जाधव यांनी पुढाकार घेत आणि मराठी तरूणीला व्यवसाय करून दिला जात नसेल तर ते मनसे ते अजिबात सहन करणार नाही,’ असं अविनाश जाधव यांनी पालिका प्रशासनाला बजावले. रेल्वे स्थानक भागात अनेक परप्रांतीय व्यवसाय करतात. मग माझ्या सारख्या मराठी तरूणीवर हा अन्याय का केला जात आहे, असा प्रश्न करत एकता सावंतने एक व्हिडीओ शेअर केला होता. (Shawarma Girl Ekta Sawant)

View this post on Instagram

A post shared by Ekta sawant (@sawant_shawarma)

तसेच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. इतकंच नाही तर हा व्हिडीओ थेट मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला. याची दखल घेत राज ठाकरे यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना एकता सावंतला न्याय देण्यास आणि तरूणीच्या हातगाडीवर पालिकेकडून कारवाई होता कामा नये यादृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले होते. यानंतर अविनाश जाधव यांनी एकता सावंतच्या स्टॉलवर जाऊन तिची भेट घेतली. तिचे अनेक प्रश्न ऐकून घेतले. शिवाय तिला त्याच जागी नवा स्टॉल लावण्याचेही आश्वासनही देण्यात आले. बुधवारी मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या हस्ते डोंबिवलीतील शोरमा स्टॉल पुन्हा त्याच ठिकाणी सुरू करण्यात आला. दरम्यान याचे व्हडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कौतुकांचा वर्षाव केलेला आहे. (Shawarma Girl Ekta Sawant)

आणखी वाचा: राकेश बापटबरोबर ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात?, ‘त्या’ फोटोंनी चर्चांना उधाण

Tags: Avinash JadhavDombivli Newsraj thackerayShawarma Girl Ekta Sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Govinda Get Threats Call

"देवाच्या कृपेने वाचला…" गोविंदाला आल्या जीवे मारण्याच्या धमक्या, घरातील बंदुकीमुळे बचावला; मॅनेजरचा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.