सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई तुझी खूप आठवण…” आईच्या निधनानंतर ‘पारू’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला, “हसऱ्या चेहऱ्याने जगणारी”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 9, 2026 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Jawade Shares Emotional Post After Mother Demise

आईच्या निधनानंतर 'पारू' फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट

Prasad Jawade Shares Emotional Post After Mother Demise: मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादे याची प्रज्ञा जवादे यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून प्रज्ञा जवादे कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र त्यांची ही झुंज ओआयशी ठरली आणि २८ डिसेंबर रोजी प्रज्ञा जवादे यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान प्रसाद जवादेचं त्याच्या आईशी खूपच घट्ट आणि जवळचं नातं होतं. अनेकदा तो आईसोबत फोटो शेअर करत भावना व्यक्त करायचा. अशातच नुकतंच त्याने आईच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा: ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रेग्नेंट?; लवकरच आनंदाची बातमी देणार, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

प्रसाद जवादेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, “Dear मम्मी तुझ्यासोबतच्या काही आठवणी, माझी निरागस, सुंदर, लढवय्यी आई. पूर्ण श्रद्धेने पूजा करणारी, आत्मियतेने शिकवणारी शिक्षिका आणि कलेची उपासक, प्रत्येक क्षण हसऱ्या चेहऱ्याने जगणारी. आई, तुझी खूप आठवण येत आहे. आम्हा सगळ्यांनाच. आणि मला माहित आहे ते तुला कळत आहे.” असं लिहीत प्रसाद जवादेने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Prasad Jawade Shares Emotional Post After Mother Demise)

View this post on Instagram

A post shared by Prasad Jawade (@prasadjawade)

प्रसाद जवादेच्या आईला २०२४ च्या दिवाळीमध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं. त्याने मालिकेत काम करावं अशी त्याच्या आईची मनापासून इच्छा होती. म्हणूनच एकीकडे ‘पारू’ मालिकेचं शूट सुरू होतं त्याचवेळी दुसरीकडे प्रसादने आईच्या उपचारांना सुद्धा सुरुवात केली. त्यामुळे बरोबर एक वर्षाने म्हणजेच २०२५ च्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात प्रसादचे कुटुंबीय त्याला सरप्राइज देण्यासाठी कार्यक्रमात पोहोचले होते. आईला मंचावर आलेलं पाहताच प्रसादला अश्रू अनावर झाले होते. यादरम्यान अभिनेत्याची पत्नी अमृता व प्रसादच्या सासूबाई सुद्धा उपस्थित होत्या. (Prasad Jawade Shares Emotional Post After Mother Demise)

आणखी वाचा: TRP चा फटका! ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ मालिका अवघ्या दोन महिन्यांत संपणार; अंतिम भागाची तारीख जाहीर, प्रेक्षक नाराज

Tags: entertainmentmarathi actorpaaru actorprasad jawadePrasad Jawade Mother DeathPrasad Jawade Shares Emotional Post After Mother Demise
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Rutuja Bagwe On Thane Gaymukh Ghat Accident

ठाणे-घोडबंदर रोडवर भीषण अपघात; या दुर्घटनेवर मराठी अभिनेत्री संतापली; म्हणाली, "सरकारने हात झटकू नये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.