रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मिसमॅच’ फेम प्राजक्ता कोळी अखेर लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2025 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Koli Vrishank Khanal Married

'मिसमॅच' फेम प्राजक्ता कोळी अखेर लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो समोर

Prajakta Koli Vrishank Khanal Married : ‘मिसमॅच्ड’ स्टार प्राजक्ता कोळी अखेर लग्नबंधनात अडकली आहे. बरेच दिवसांपासून प्राजक्ता कोळीच्या लग्नाची सोशल मीडियावर हवा होती. अखेर तिने तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड वृषांक खनालशी लग्न केले. सुमारे १३ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, दोघांनी महाराष्ट्रातील कर्जत येथील ओलिअँडर फार्म्समध्ये लग्न केले. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते. २५ फेब्रुवारी रोजी, प्राजक्ताने वृषांकबरोबरचे हृदयस्पर्शी फोटो शेअर केले आणि चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

या फोटोंसह कॅप्शनमध्ये तिने फक्त लग्नाची तारीख लिहिली. “२५.०२.२५”. याबरोबर तिने हार्ट ईमोजीदेखील जोडले. लग्नाचे वृत्तांकन करणाऱ्या ‘व्होग इंडिया’ने या दोघांच्या प्रवासाची खास झलक दाखवली. इंस्टाग्रामवर त्यांनी लिहिले की, “जवळजवळ ११ वर्षांच्या नात्यानंतर, वृषांक खनालने सप्टेंबर २०२३ मध्ये वेस्ट व्हर्जिनियामधील कॅम्पिंग ट्रिप दरम्यान प्राजक्ता कोळीला प्रपोज केले. आणि जेव्हा त्यांनी लग्नाची योजना आखली तेव्हा असे काहीतरी घडले”.

आणखी वाचा – ‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजचा पहिला भाग उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता शिगेला

View this post on Instagram

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

व्होगशी झालेल्या संभाषणात दोघांनी या खास दिवसाबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, “आम्ही आमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगितले की ते पायजमा घालून येऊ शकतात, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त इतकंच हवं होतं की त्यांनी चांगली विश्रांती घ्यावी आणि मजा करावी अशी इच्छा होती. माझ्या थीमनुसार सर्वकाही आरामदायी असावे अशी माझी इच्छा होती. पारिजातकाच्या नमुन्यांसह आणि सजलेल्या सोनेरी लेहेंग्यात प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती तर वृषांकने हस्तिदंती शेरवानी परिधान केली होती.

आणखी वाचा – १३व्या वर्षी लग्न, ३०शी पर्यंत १५ मुलं अन्…; पुरुषांच्या ‘त्या’ वागण्यावर नसिरुद्दीन शाह यांनी केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत

प्राजक्ता आणि वृषांक बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याने पहिल्यांदा २०२३ मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली, त्यानंतर लोकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. कामाबद्दल बोलायचे झाले तर, प्राजक्ता अलीकडेच रोहित सराफबरोबर ‘मिसमॅच्ड सीझन ३’ मध्ये दिसली होती. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

Tags: mismatched actressPrajakta Koli Vrishank KhanalPrajakta Koli Vrishank Khanal Married
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Govinda Sunita Ahuja Divorce

अफवा! गोविंदाच्या घटस्फोटाबाबत कृष्णा अभिषेकच्या पत्नीचं भाष्य, भाची आरती सिंहलाही बसला धक्का, म्हणाली, "तो भारतात नसून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.