महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. सर्व स्तरातून या कार्यक्रमाचं कौतुक होत असताना काही प्रेक्षक मात्र या कार्यक्रमाबद्दल नकारात्मक भूमिका मांडताना दिसतायत.
नुकताच महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या स्टोरीला एका चाहत्याने ‘ MHJ आता फॅमिली शो राहिला नाही फॅमिली सोबत बसून तुमच्या जोक वर हसलो तर तिथेच विषय संपतो’ असं म्हणत आपलं मत मांडलं आहे तर पृथ्वीक ने सुद्दा परखडपणे याला उत्तर दिलं आहे.

पृथ्वीक म्हणाला ‘ इनकॉग्निटो मोड मध्ये जाऊन पॉर्न पाहणार्यांनी फॅमिली शोचं पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये. दिवसाला आई बहिणी वरून १०० शिव्या घालणार्यांना सुद्दा एखादा डबल मिनिंग पंच आला कि त्रास होतो. वाह रे दुनिया’.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने साऱ्यांनाच खळखळून हसवले. महाराष्ट्रातील हा असा एकमेव शो आहे ज्याने सगळ्यांच्या टेन्शवरील मात्रा दूर करण्यास भाग पाडतो. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच पात्रांवर चाहते भरभरून प्रेम करतात. विनोदी शैलीमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. या कार्यक्रमातील सर्वांचा लाडका असा एक अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. मालिकाविश्वात पृथ्वीकने काम केले मात्र पृथ्वीकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळेच. या लोकप्रिय कार्यक्रमामुळे पृथ्वीकला खरी ओळख मिळाली.
या प्रसिद्ध कार्यक्रमातील सगळीचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढू लागली आहे. फक्त महाराष्ट्राचं न्हवे तर संपूर्ण जगाला यातील निखळ अभिनयाने वेड लावले आहे. समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, पंढरीनाथ कांबळे अशा अनेक मात्तबरांच्या जोडीला गौरव मोरे, रोहित माने, वनिता खरात, इशा डे, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, दत्तू मोरे, निखिल बने, असे अनेक तरुण तरुणी यांच्या खांद्याला खांदा लावून काम लोकांचं मनोरंजन करण्याच्या या अठ्ठाहासात पूर्ण पणे उतरले.