Maitricha Saatbara Song : मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते. कधी-कधी ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही त्या आपण सहजपणे आपल्या मित्रांना सांगतो. नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो. आपली विचारांची तार जुळत असेल तर काहीही आडपडदा न ठेवता आपण मित्र-मैत्रिणींशी सर्वकाही शेअर करतो. जो आपल्याला समजून घेतो व आपल्या हाकेला ओ देतो तोच खरा मित्र. मैत्री या शब्दाचं विश्लेषण करणारी अशीच एक नवीकोरी वेबसीरिज आपल्या भेटीस येत आहे. मैत्रीचा सातबारा असे या मराठी वेबसीरिजचे नाव आहे.
या सीरिजमधील कलाकारांची ओळख आपल्याला कॅरेक्टर पोस्टरवरुन झाली आहे. आता यापाठोपाठ ही मैत्री नेमकी कशी आहे हे दाखवणार असं ‘मैत्रीच्या सातबारा’ सीरिजचं टायटल सॉंगही प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अर्थात या गाण्यात मैत्रीचा दिलखुलासपणा अनुभवायला मिळत आहे. आकर्षक अशी वाक्यरचना असलेलं हे मैत्रीवर आधारित गाणं साऱ्या तरुणाईला भुरळ पाडतंय. मैत्रीचा सातबारावर आता ही कलाकार मंडळी नेमकी काय आणि कशी धमाल करणार याची काहीशी झलक आपल्याला या मैत्रीचा सातबारा या गाण्यातून पाहायला मिळतेय.
भिन्न स्वभावाचे, भिन्न राहणीमान असलेले हे सहा मित्र एका पटलावर आल्यावर काय गोंधळ घालतात हे या गाण्यातून पाहणं रंजक ठरतंय. अर्थात या गाण्यामुळे सीरिज केव्हापासून सुरु होणार याची उत्सुकता वाढली आहे यांत शंकाच नाही. तर येत्या २६ फेब्रुवारीपासून हा ‘मैत्रीचा सातबारा’ साऱ्यांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. तत्पूर्वी या गाण्याने ही उत्सुकता द्विगुणित केली आहे. या गाण्याचे संगीत प्रणव हरिदास यांनी सांभाळली आहे. तर या गाण्याला समृद्धदि पांडे हिने शब्दबद्ध केले आहेत. तर या मैत्रीच्या गाण्याला अवधूत गुप्ते आणि कस्तुरी साईराम यांनी स्वरबद्ध केलं आहे.
आणखी वाचा – ‘इंडियाज गॉट लेटेंट’ स्क्रिप्टेड नाहीच, जजला शोसाठी पैसेही मिळत नाहीत, प्रकरण तापलं असताना सत्य उघड
Media One Solutions Presents & Itsmajja Original ही आगळी वेगळी वेबसीरिज ‘मैत्रीचा ७/१२’ येत्या २६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. ‘मैत्रीचा ७/१२’ या नव्याकोऱ्या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अजय पवार यांनी पेलवली आहे. तर निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी सांभाळली आहे. तसेच या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे या आहेत. कथा-पटकथा शुभम पाठक यांची असून संवाद ऋषिकेश डी. वाय. पवार यांचे आहेत. तर काही मोजक्या एपिसोडचे संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत. येत्या २६ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता ‘मैत्रीचा ७/१२’ ही नवीकोरी सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.