Ankita Walawalkar Wedding : सध्या कलाविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस’ फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हीची सुद्धा लगीनघाई सुरु आहे. बरेच दिवसांपासून अंकिता व कुणाल भगत हे लग्न बंधनात अडकणार असल्याचं समोर कानावर येत होतं. अखेर आता त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे लवकरच ही जोडी सात फेरे घेण्यास सज्ज झाली असल्याचं दिसतंय. कुणाल व अंकिता यांच्या लग्नसमारंभाला सुरुवात झाली असून लग्नापूर्वीचे विधी अगदी थाटामाटात सुरू झालेत. कुणाल आणि अंकिता हे कोकणात देवबाग येथे लग्न बंधनात अडकणार आहेत.
त्या दोघांच्या लग्नासाठी अनेक कलाकार मंडळी तसेच मित्रपरिवार आणि नातेवाईकही उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. अखेर अंकिताच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले असून यावेळी अंकिता व कुणाल यांचा पारंपरिक लूक साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. दोघांनीही भगव्या रंगाला पसंती दिली असून मॅचिंग आऊटफिट परिधान केल असल्याचे पाहायला मिळालं. अंकिताने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो खास कॅप्शनसह पोस्ट केले आहेत. “तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू काही करु शकत नाहीस”.
आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, हातावर रंगली मेहंदी, पहिला फोटो समोर
तिने पुढे असं लिहिलंय की, “आयुष्यात असं बोलणाऱ्या गर्दीमध्ये जेव्हा कोणी हे बोलतं तू जशी आहेस तशी फार सुंदर आहेस, तू प्रेमळ आहेस आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तू जशी आहेस तशीच कायम राहा कारण मी तुझ्या असण्यावर प्रेम करतो. तेव्हा वाटलं आयुष्याला खरा अर्थ आहे. त्याच आयुष्याची पहिली पायरी सोबत चढतोय. आशीर्वाद असुद्या”, असं म्हणत तिने थेट मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
मेहंदीच्या दिवशीच अंकिता व कुणालच्या टीममध्ये क्रिकेटची मॅच रंगलेली पाहायला मिळाली. त्यांचा मित्रपरिवार या खेळात सहभागी झालेला पाहायला मिळाला. अंकिताच्या लग्नाला धनंजय पोवारची हजेरीही लक्षवेधी ठरतेय. दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर रिव्हिल करत आयुष्याची एक नवीन सुरुवात करणार असल्याचं आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं.