Ankita Walawalkar Wedding : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळीही लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. यापाठोपाठ आता आणखी एका लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळतेय. ती म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस’ फेम अंकिता वालावलकर. ‘बिग बॉस मराठी’मुळे अंकिता वालावलकरला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. कोकणी भाषेतील अनेक रील व्हिडीओ बनवून अंकिता नेहमीच नवनवीन व आशयघन व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आता प्रेक्षकांची ही लाडकी कोकणहार्टेड गर्ल लग्नबंधनात अडकणार आहे.
अंकिताची लगीनगाई सुरु झाली असल्याचं समोर आलं आहे. अंकिता व कुणाल भगत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओवरुन याची झलक पाहायला मिळत आहे. अंकिता व कुणाल अंकिताच्या कोकणातील घरी मालवण देवबाग येथे लग्नबंधनात अडकणार आहेत. यासाठी तिचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवारही कोकणात पोहोचला आहे. अनेकांनी अंकिताला टॅग करत कोकणात येत असल्याच्या स्टोरी पोस्ट केल्या आहेत. शिवाय अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घरासमोर मंडपही सजलेला पाहायला मिळत आहे. गावाकडे अत्यंत मराठमोळ्या पद्धतीने हे लग्न पार पडणार असल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अंकिताच्या कुटुंबीयांनी व मित्र-मंडळींनी खूप धमाल मस्ती केलेलीही पाहायला मिळत आहे. त्यांचा डान्स व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनेही लग्नासाठी हजेरी लावलेली पाहायला मिळतेय. तसेच वर्हाडी मंडळी येताच अंकिताच्या माहेरच्या लोकांनी सुंदर असा डान्स करत त्यांचं स्वागत केलेलं पाहायला मिळालं. अंकिताने “झी मराठीचा आहेर आमच्या घरात, नवऱ्याकडचे आले रे”, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – परदेशात गेला समय रैना, तर रणवीर अलाहबादियाचे फॉलोअर्सही कमी, दोघांनाही १० वर्षांची होऊ शकते शिक्षा?
दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिता वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतबरोबरच्या नात्याची ग्वाही दिली. याचबरोबर अंकिता आणि कुणाल लवकरच लग्न करणार असल्याचंही चाहत्यांना सांगितलं. अंकिताने सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा कुणालबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. यानंतर अनेकदा अंकिता व कुणाल एकत्र स्पॉट झाले. कुणाल भगत हा सिनेविश्वात संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे.