रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत अमेरिकेमध्ये कायमची स्थायिक झालेली ‘ही’ मराठी अभिनेत्री आता दिसते अशी, दिवाळीचे फोटो पाहता चाहते म्हणाले, “भारतात कधी परतणार?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2023 | 4:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunal Dusanis Diwali Look

अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत अमेरिकेमध्ये कायमची स्थायिक झालेली 'ही' मराठी अभिनेत्री आता दिसते अशी, दिवाळीचे फोटो पाहता चाहते म्हणाले, "भारतात कधी परतणार?"

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. साधी, सोज्वळ, सुशील अशा अभिनेत्रींच्या यादीत मृणालचं नाव आवर्जून घेतलं जातं. छोटा पडदा गाजवलेल्या मृणालने मात्र काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. सध्या मृणाल मालिकाविश्वात सक्रिय असलेली पाहायला मिळत नाही. सिनेसृष्टीपासून दूर गेलेल्या या अभिनेत्रीला प्रेक्षक आजही मिस करत असल्याचं पाहायला मिळतं. (Mrunal Dusanis Diwali Look)

दिवाळीनिमित्त मृणालने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. यांत मृणालसह तिचा पती निरज मोरे, आणि तिची लेक नुरवी पाहायला मिळतेय. भारताबाहेर म्हणजेच अमेरिकेत असूनही मृणालने दिवाळी साजरी केली असल्याचं पाहायला मिळतंय. दिवाळीनिमित्त मृणाल व तिच्या कुटुंबीयांचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला. शिवाय नुरवीला मोठं झालेलं पाहून अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. नुरवीने खणाचा फ्रॉक परिधान केला असून कपाळावर चंद्रकोर आणि गळ्यात घातलेली ठुशीने अगदी तिचं रूप खुलून आलं आहे.

आणखी वाचा – Video : आदेश बांदेकरांच्या एकत्रित कुटुंबाचं सर्वत्र कौतुक, इमारतीच्या पटांगणात औक्षणानंतर कारिट फोडलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

मृणालने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला परत येण्याची विनंती केली आहे. अभिनेत्री विदिशा म्हसकरने कमेंट करत, “अगं, किती पटापट मोठी होतेय” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका चाहत्याने. “ताई तु भारतात कधी परत येणार आम्ही तुला खुप मिस करतोय” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने, “निदान या दिवाळीत तरी भारतात असायला हव होतं ना मृणाल” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी मृणालला मिस करत असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

आणखी वाचा – “मला फरक पडत नाही कारण…”, दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून कोणत्याच गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही प्रिया बापट, म्हणाली, “कोणत्याही सणाला…”

२०१६मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. तिला आता एक गोड मुलगी आहे. आई झाल्यानंतर मृणालने काही काळ कलाक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळतंय. नीरज व मृणाल त्यांच्या लेकीसह सध्या अमेरिकेत राहत आहेत.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialmrunal dusanis
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Madhurani Gokhale-Prabhulkar share a photo

'आई कुठे…' फेम मधुराणी प्रभूलकरला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शाबासकीची थाप, फोटो शेअर करत म्हणाली, "अक्षरशः…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.