‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. साधी, सोज्वळ, सुशील अशा अभिनेत्रींच्या यादीत मृणालचं नाव आवर्जून घेतलं जातं. छोटा पडदा गाजवलेल्या मृणालने मात्र काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. सध्या मृणाल मालिकाविश्वात सक्रिय असलेली पाहायला मिळत नाही. सिनेसृष्टीपासून दूर गेलेल्या या अभिनेत्रीला प्रेक्षक आजही मिस करत असल्याचं पाहायला मिळतं. (Mrunal Dusanis Diwali Look)
दिवाळीनिमित्त मृणालने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. यांत मृणालसह तिचा पती निरज मोरे, आणि तिची लेक नुरवी पाहायला मिळतेय. भारताबाहेर म्हणजेच अमेरिकेत असूनही मृणालने दिवाळी साजरी केली असल्याचं पाहायला मिळतंय. दिवाळीनिमित्त मृणाल व तिच्या कुटुंबीयांचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला. शिवाय नुरवीला मोठं झालेलं पाहून अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. नुरवीने खणाचा फ्रॉक परिधान केला असून कपाळावर चंद्रकोर आणि गळ्यात घातलेली ठुशीने अगदी तिचं रूप खुलून आलं आहे.
मृणालने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला परत येण्याची विनंती केली आहे. अभिनेत्री विदिशा म्हसकरने कमेंट करत, “अगं, किती पटापट मोठी होतेय” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका चाहत्याने. “ताई तु भारतात कधी परत येणार आम्ही तुला खुप मिस करतोय” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने, “निदान या दिवाळीत तरी भारतात असायला हव होतं ना मृणाल” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी मृणालला मिस करत असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं.
२०१६मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. तिला आता एक गोड मुलगी आहे. आई झाल्यानंतर मृणालने काही काळ कलाक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळतंय. नीरज व मृणाल त्यांच्या लेकीसह सध्या अमेरिकेत राहत आहेत.