छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांची लाडकी बनलेली चिमुरडी म्हणजे मायरा वायकुळ. सोशल मीडिया स्टार असलेली मायरा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. तिने साकारलेली परीची भूमिका रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. गोंडस आवाज व निरागसपणा यांमुळे मायरा संपूर्ण प्रेक्षकांची लाडकी बनली गेली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. त्याचबरोबर हिंदी मालिकेततूनही तिने आपल्या अभिनयाची जादू देशभरातील प्रेक्षकांना दाखवली आहे. (Myra Vaikul got emotional on Ganesh Visarjan)
अभिनयाव्यतिरिक्त मायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती याद्वारे अनेक फोटोज व व्हिडिओज तिच्या चाहत्यांसमोर नेहमीच शेअर करत असते. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे आनंददायी वातावरण आहे. त्यानिमित्ताने अनेकांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे. काही दिवसांपूर्वी मायराच्या घरीदेखील गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. तिच्या यंदाच्या बाप्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच, मायराच्या घरी आलेला बाप्पा पाच दिवसांचा पाहुणचार घेऊन आपल्या गावी निघालेला आहे.
हे देखील वाचा – ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खान का नाही?, अखेर मिळालं उत्तर, फरहान अख्तरचा मोठा खुलासा, म्हणाला, “दोघंही वेगळे झालो कारण…”
अशातच मायराच्या घरच्या बाप्पाचे नुकतंच विसर्जन झाले असून यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देताना तिच्या डोळ्यात पाणी आले होते. गणेश विसर्जनाचा हा व्हिडिओ व्हायरल तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामध्ये तिचे वडील भावुक निरागस मायराला समजावताना दिसत आहे. या व्हिडिओसह दिलेल्या कॅप्शनमध्ये मायरा म्हणते, “बाप्पा निघाले आपल्या गावी रे…”. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी भावुक झाले आहे. कमेंट्सद्वारे ते भावना व्यक्त करताना दिसतायत.
हे देखील वाचा – काही महिन्यांमध्येच ‘काव्यांजली’ मालिकेमधून प्रसाद जवादेचा काढता पाय, पण यामागचं नेमकं कारण काय?
बालकलाकार मायरा वायकुळ काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘देवबाप्पा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. ज्यात ती व्हायरल व्हिडिओ फेम साईराज केंद्रेबरोबर झळकली आहे.