मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी अभिनय क्षेत्राबरोबरच अन्य व्यवसायातही गुंतले असून ही यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊननंतर बरेचसे कलाकार हॉटेल व्यवसायक्षेत्रात उतरलेले असताना काही कलाकार हे आधीपासून या व्यवसायात गुंतले आहे. असेच एक कलाकार म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत विश्वजीतकाकाची भूमिका साकारणारे अभिनेते आनंद काळे. (Anand Kale hotel ad)
‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘संत गजानन शेगावीचे’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ यांसारख्या मालिकेत दिसलेले अभिनेते आनंद काळे हे बऱ्याच वर्षांपासून मराठी अभिनयसृष्टीत काम करण्याबरोबरच ते हॉटेल व्यावसायिकदेखील आहे. कोल्हापुरात त्यांची ‘हॉटेल राजपुरुष’ व ‘हॉटेल कार्निव्हल’ अशी दोन हॉटेल्स असून त्यातल्याच एका हॉटेलमध्ये आनंद यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक स्पेशल ऑफर आणली आहे.
हे देखील वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा सिझन येणार ? श्रेयसने दिली हिंट
एकीकडे टोमॅटोला चांगले भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, पण यांमुळे काही हॉटेल्समध्ये टोमॅटोचा वापर कमी होऊ लागलाय. तरीही अभिनेते आनंद काळे यांनी आपल्या हॉटेल कार्निव्हलमधल्या ग्राहकांसाठी एक स्पेशल ऑफर आणली आहे. “मॅकच्या डोनाल्ड काकाला नाही परवडत…पण कोल्हापूरकरांचं नाही तटत…३३ फ्रेश टोमॅटोच्या ग्रेव्हीत बनवलेलं बटर चिकन आहे त्याच दरात” अशाप्रकारची भन्नाट जाहिरात करत त्यांनी ही ऑफर आणली. त्यांनी या जाहिरातीचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताना ही पोस्ट शेतकरी बांधवांसाठी समर्पित असल्याचं उल्लेख केलंय. या पोस्टमधून आनंद यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायला हवा असल्याचे मत व्यक्त केले.(Anand Kale on Tomato price hiked)
अभिनय व हॉटेल व्यवसायाबरोबरच अभिनेते आनंद काळे यांचे ‘महालक्ष्मी सिने सर्व्हिस’ या नावाने प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे, ज्यामधून ते मालिका, चित्रपटांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचा पुरवठा करतात.