मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही कारण…”, मयुरी वाघ स्पष्टच बोलली, म्हणाली, “एखादी व्यक्ती माझ्यावर हात उचलतेय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 11, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mayuri wagh second marriage news

"दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही कारण…", मयुरी वाघ स्पष्टच बोलली, म्हणाली, "एखादी व्यक्ती माझ्यावर हात उचलतेय…"

mayuri wagh second marriage news : मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ. मयुरी वाघने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत रसिकांच्या मनात घर केलं. अस्मिता ही तिची गाजलेली मालिका. ‘अस्मिता’ या मालिकेमुळेच तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याच मालिकेच्या सेटवर तिच्या वैयक्तिक आयुष्याला कलाटणी मिळाली. मालिकेच्या सेटवर मयुरी सहकलाकार पियुष रानडेच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्नाच्या वर्षभरातच वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. आणि यानंतर वैयक्तिक आयुष्यात मयुरी पुरती कोलमडली.

मयुरीला घटस्फोटाच्या या धक्क्यातून सावरायला बराच काळ गेला. या तिच्या आयुष्यातील मोठ्या धक्क्याबाबत ती कधीच बोलली नाही. मात्र नुकत्याच सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं. या काळात आलेलं चढ-उतार, मिळालेली सहकलाकारांची साथ, मित्रांची साथ आणि आई वडिलांचा पाठिंबा याने तिला कसा धीर मिळाला याबाबत मयुरीने भाष्य केलं. दुसऱ्या लग्नाचा किंवा जोडीदाराचा विचार केला का? किंवा आयुष्यात पुढे गेलं पाहिजे असं वाटलं का?” असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला होता.

आणखी वाचा – “प्रेमात होते म्हणून विचार न करताच लग्न केलं”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, “मी विश्वास ठेवला तीच व्यक्ती…”

View this post on Instagram

A post shared by Mayurri Girish (@mayurri.wagh_official)

यावर मयुरी म्हणाली, “आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवणं जड जात होतं. हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय हे मला पचतच नव्हतं. एखादी व्यक्ती माझ्यावर हात उचलतेय हे कसं काय घडू शकतं. असं काही होऊच शकत नाही या भावनेत मी होते. प्रत्येक गोष्ट स्वीकारायला मला खूप वेळ गेला. मी कायदेशीर गोष्टी सुद्धा करु शकत होते पण काहीच केलं नाही. कारण, मी सतत दडपणाखाली होते”.

आणखी वाचा – शरीर काळं-निळं पडलं आणि…; अभिनेत्याच्या मृत्यूवर मित्र आणि कुटुंबीयांचा धक्कादायक दावा, मृत्यूस डॉक्टरांना जबाबदार धरले

शेवटी मयुरी म्हणाली, “आता कोणत्या गोष्टीवरुन वाद होईल, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल याचा काहीच अंदाज नव्हता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी खूप संघर्ष केला. यामुळे पुढचे काही महिने मी स्वतःला सगळ्यापासून दूर ठेवलं होतं”.

Tags: mayuri waghmayuri wagh marriagemayuri wagh second marriage
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Abhang Tukaram Movie

’अभंग तुकाराम’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अजय पुरकर, फर्स्ट लूक समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.