कलाकार असो किंवा गायक, मराठी कलाविश्वातील अनेक प्रसिद्ध चेहरे गेल्या काही दिवसांपासून विवाहबंधनात अडकली आहेत. अशातच कलाक्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आनंदी जोशी व प्रसिद्ध गायक-संगीतकार जसराज जोशी यांनी गुपचूप लग्न उरकलं आहे. दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले असून त्यांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Anandi Joshi Jasraj Joshi Marriage)
छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप’ या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेले दोन गायक आनंदी जोशी आणि जसराज जोशी हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर या दोघांनी लग्नाची गोड बातमी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दोघांनी मुंबईत कोर्ट मॅरेज केलं असून त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आनंदी व जसराज यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये या जोडीने पारंपरिक वेशभूषा परिधान करत दोघांच्या गळ्यात माळ व हातात मॅरेज सर्टिफिकेट दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना आनंदी लिहिते, “With utmost respect, we humbly request your blessings as we step into a new phase of life.” या पोस्टवर कलाविश्वातील अन्य कलाकारांनी व चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
हे देखील वाचा – मराठी मनोरंजनविश्वातील अनुभवी कलाकारांसह रंगणार ‘अंकुश’ची कथा अशी असणार धमाकेदार चित्रपटाची, धमाकेदार स्टार कास्ट
हे देखील वाचा – अमेरिकेत कसिनोमध्ये ७०० डॉलर जिंकला गौरव मोरे, स्वतःच सांगितला ‘तो’ धमाल किस्सा
हिंदी सारेगमप २०१२चा विजेता असलेला गायक जसराज जोशीने अनेक चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज देण्याबरोबरच चित्रपटांना संगीतही दिले आहे. तर गायिका आनंदी जोशीने मराठी, हिंदी, गुजराती सारख्या अनेक भाषेतील चित्रपटांच्या गाण्यांसाठी तिने पार्श्वगायन केले आहे. त्याचबरोबर दोघेही अनेक ठिकाणी एकत्र कार्यक्रमदेखील करतात. (Anandi Joshi Jasraj Joshi Marriage)