‘ऐका दाजिबा’मुळे घराघरात पोहोचलेली सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिने तिच्या गायनाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. वैशाली सामंत हिच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. आजवर वैशालीने तिच्या दमदार आवाजात अनेक गाणी गायली आहेत. वैशालीच्या आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांची गाणी गात मोठा पडदा ही गाजवला आहे. (Vaishali Samant New Post)
वैशाली सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच या गायिकेने शेअर केलेल्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गायिकेने नुकत्याच एका मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला आहे. नाशिक, कोल्हापूर येथे प्रसिद्ध असलेली दर्जेदार मिसळ खाण्यासाठी खवय्ये लांबून प्रवास करून येतात.
अशीच गायिका वैशाली सामंत ही खूप मोठी मिसळीची खवय्यी आहे. बर ही खवय्यी असलेली गायिका या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी ना नाशिक, ना कोल्हापूर तर थेट लंडनला पोहोचली आहे. लंडनला मोठ्या, भव्य अशा पॅलेसमध्ये बसून मिसळ खातानाचा फोटो वैशालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. वैशालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मधून ओरीचा काढता पाय, फक्त एका दिवसातच घरातून पडला बाहेर कारण…
लंडनच्या पॅलेसमध्ये बसून आपली अस्सल मिसळ खाणं एक वेगळाच आनंद होता. ना पुणे, ना नाशिक, ना कोल्हापूरी टेस्ट मनोरंजनाच्या मेजवानीत ‘लंडन मिसळ’ इज बेस्ट असं म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे. लंडनच्या पॅलेसमध्ये शूट झालेला हा बीटीएस वैशालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत हा एका चित्रपटातील बीटीएस असल्याचं म्हटलं आहे. आगामी ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचं टायटल सॉंग वैशालीने गायलं आहे. हे तिच्या पोस्टवरून कळतंय.