२०२४ हे वर्ष आता सरत आलं आहे. अवघ्या काही दिवसांतच नवीन वर्ष सुरू होईल. या वर्षात मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडल्या. मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांनी जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. या वर्षात लग्नबंधनात अडकणारे हे कलाकार कोणते? चला जाणून घेऊया… (Marathi Artists Marriages in 2024)
- शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापुरकर : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ या मालिकांमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शाल्व किंजवडेकर. शाल्वने नुकतीच त्याच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यावर शाल्व व त्याची बायको श्रेया डफळापुरकर यांनी १४ डिसेंबर रोजी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. शाल्वची बायको श्रेया ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे.
- किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर : ‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरणने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. किरण-वैष्णवीचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्नसोहळा पार पडला.
- रेश्मा शिंदे व पवन : ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. २९ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली. २९ नोव्हेंबरला तिने बॉयफ्रेंड पवनबरोबर लग्नगाठ बांधली. रेश्माने महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. पवन हा साऊथ इंडियन आहे.
- अभिषेक गावकर व सोनाली गुरव : ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकरने रिलस्टार सोनाली गुरवबरोबर २६ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. अभिषेक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
- पृथ्वीक प्रताप व प्राजक्ता वायकुळ : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला. पृथ्वीक प्रतापने २५ ऑक्टोबर दिवशी त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या प्राजक्ता वायकुळशी लग्नगाठ बांधली. दोघांचा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.
- निखिल राजशिर्के व चैत्राली मोरे : रंग माझा वेगळा, अरुंधती, छोटी मालकीण, माझी तुझी रेशीमगाठ, मुव्हिंग आऊट अशा मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या निखिल राजशिर्केनेही नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. चैत्राली मोरे हिच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं निखिल लग्नगाठ बांधली