बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर यांच्या लग्नाला आता सहा महीने पूर्ण झाले आहेत. जून २०२४ मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर दोघंही अनेक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्यांचे परदेशदौऱ्याचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. अमेरिका, इटली, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, तसेच भारतातील अनेक ठिकाणी त्यांनी फिरण्याचा आनंद घेतला आहे. सोनाक्षी या दरम्यान सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते. सोनाक्षीने नुकतेच एक मीम शेयर केले आहे. या मीममध्ये फिरण्यामुळे आई व सासू कशा प्रतिक्रिया देतात? याबद्दल सांगितले आहे. (sonakshi sinha funny reel)
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर एक विनोदी रील शेयर केले आहे. यामध्ये विमानाच्या आतील फोटो आहे तसेच यावर सिलियन मर्फीचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच लिहिले आहे की, “माझी आई व सासू आम्हाला बघत हा विचार करत आहेत की नातवंडाशिवाय हे लोक फिरत आहेत”. सोनाक्षीने हे मीम शेयर करत झहीरला टॅग केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोनाक्षी गरोदर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. मात्र सोनाक्षीने गरोदर नाही तर जाड झाली आहे असं सांगितलं होतं.
गरोदरपणाच्या चर्चावर सोनाक्षी म्हणाली की, “सोनाक्षीने गरोदरपणाच्या चर्चांवर भाष्य केले. ती म्हणाली, “मला हे सांगायचं आहे की मी गरोदर नाही. मी फक्त जाड झाले आहे”. दरम्यान एका नेटकऱ्याने सोनाक्षीला गरोदर असल्या कारणाने शुभेच्छादेखील दिल्या होत्या. सोनाक्षी पुढे म्हणाली की, “लग्नानंतर फिरण्यात आणि लंच-डिनरमध्येच आम्ही व्यस्त आहोत. त्यामुळे इतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही”.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरने दोघांनी एकमेकांना ७ वर्षे डेट केल्यानंतर यावर्षी २३ जून रोजी मुंबईत लग्न केले. झहीर आणि सोनाक्षीने एकत्र काम केले आहे. दोघे ‘डबल एक्सएल’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात . सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात आणि चाहतेही या दोघांच्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद देतात.