शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दहा भावांची एक बहीण आणि…”, शिंदे कुटुंबातील लाडक्या मुलीचा शाही विवाहसोहळा संपन्न, भावंडंही भावुक, उत्कर्ष म्हणाला, “काकू गेल्यानंतर…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 3, 2024 | 3:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi singer and Big Boss Marathi fame Utkarsh Shinde shared a special video of his sister's wedding on social media.

"दहा भावांची एक बहीण आणि...", शिंदे कुटुंबातील लाडक्या मुलीचा शाही विवाहसोहळा संपन्न, भावंडंही भावुक, उत्कर्ष म्हणाला, "काकू गेल्यानंतर..."

‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत लोकप्रिय झालेला गायक, संगीतकार व अभिनेता म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे व त्याच्या खास लेखनशैलीने सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. उत्कर्ष हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो व कामाबद्दलची माहिती तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच त्याने आपल्या बहिणीबद्दलचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

नुकतेच उत्कर्ष शिंदेच्या बहिणीचे लग्न झाले असून उत्कर्षने आपल्या बहिणीबद्दल एक खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये उत्कर्षने बहिणीचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “दहा भावांची एक बहीण. कर्तृत्ववान, सहनशील, समजूतदार, मायाळू, लहानपणापासून सगळ्याना जीव लावणारी आमची ‘ताई’. लग्नात हजारो शुभचिंतक जरी होते तरी आमची काकू ज्योती मिलिंद शिंदे यांची खूप आठवण आली. कोरोनामध्ये ती आम्हा सर्वांना सोडून गेली. काकूनंतर सर्वात लहान असून ताईने आईची जागा घेत भावांना व काकाला प्रेमाने सांभाळल”.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

आणखी वाचा – अरुण कदमांची लेक व जावयाने ठाण्यामध्ये सुरु केलं स्वतःचं मोठं रेस्टॉरंट, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, नावही ठेवलं फारच खास

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “खऱ्या अर्थाने भावांचं नाक उंच ठेवणारी आमची ताई. सक्षम, संवेदनशील, परिपक्व विचारांची आमची मैत्रीण, काकू तरी कधी आमच्या आजीचं रुप घेणारी आमची ताई. तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ताई कधीच टेन्शन घेऊ नकोस तुझे भाऊ नेहमी तुझ्याबरोबर आहेत.” उत्कर्षने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संपूर्ण शिंदे घराणे दिसत आहे. उत्कर्ष व आदर्श शिंदे यांच्यासह त्यांचे भावंडेही दिसत आहेत.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लेक स्वयंपाकघरात घासत आहे भांडी, शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ, टेबलवर चढली अन्…

दरम्यान, उत्कर्षने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी १० भावांची बहीण ताई नशीबवान आहे”, “किती गोड”, खूपच छान”, अशा अनेक कमेंट्सद्वारे अनेकांनी उत्कर्षच्या बहिणीला तिच्या लग्नानिमित्त अभिनंदन व शुभेच्छाही दिल्या आहेत.   

Tags: marathi entertainment newsmarathi singerutkarsh shindeUtkarsh Shinde Sister Marriage News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
heeramandi season 2 announcement

Heeramandi 2 : संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा, प्रोमोने वेधलं लक्ष, पुढे काय पाहायला मिळणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.