नेटफ्लिक्सवरील ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ ही वेबसीरिज सध्या खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे समोर आले काही जुने चेहरे खूप वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक व संगीतकार संजयलीला भन्साळी यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. मनीषा कोइराला, शेखर सुमन, फरदीन खान असे अनेक जुने कलाकार पुन्हा या सिरिजच्या निमित्ताने समोर आले आहेत. या सीरिजच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन केले. तसेच खूप पसंतीदेखील मिळाली. या सीरिजमधील प्रत्येक पात्रांशी चाहता जोडला गेला. आता या सीरिजबद्दल एक अपडेट समोर आली आहे. (heeramandi season 2 announcement )
संजय लीला भन्साळी यांच्या दर्जेदार कलाकृती नेहमी चर्चेत असतात. भव्यदिव्य सेट, भरजरी कपडे, भाषा, संगीत, नृत्य या सगळ्यांमुळे त्यांच्या चित्रटपटांना खूप पसंती मिळते. ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची हिरामंडी तसेच तेथील स्त्रियांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील सर्व गाणी, संवाद यामुळे खूप पसंती मिळाली. सोशल मीडियावर या चित्रपटातील विविध गाण्यांवर नृत्य करताना नेटकरी दिसतात.
आता या सीरिजचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे अंदाज बांधण्यात येत आहेत. नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम पेजवरुन ‘हिरमंडी 2’ येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ताजदारची भूमिका करणारा ताहा शाहने हार्ट इमोजी पोस्ट केली असून अदिती राव हैदरीनेदेखील आनंद व्यक्त केला आहे.
दुसऱ्या सीजनची घोषणा होताच अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “सीजन 2? नेटफ्लिक्सचे खूप आभार”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ताजदार व बिब्बोजानशिवाय हिरामंडी?”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “मला पहिल्याच एपिसोडमध्ये आलमजेबचा मृत्यू बघायचा आहे”.
पण दुसऱ्या सीजनमध्ये मल्लिकाजान व फरदीनमधील लढाई पाहायला मिळणार का?, तसेच ताजदार व बिब्बोजान यांच्याशिवाय सगळं कसं असेल? शर्मिनच्या मुलाचं काय होणार?असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक दुसऱ्या सीजनची आतुरतेने वाट बघत आहेत.