मागील काही दिवसांमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अनेक अनेक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री रेंजुषा मेनन, डॉ. प्रिया व ज्युनिअर बलैया यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने चाहत्यांसह कलाकारांना मोठा धक्का बसला होता. अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये झळकलेले लोकप्रिय अभिनेते विनोद थॉमस यांचं नुकतंच निधन झालं. ते ४५ वर्षांचा होते. पण त्यांच्या निधनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (South Actor Vinod Thomas died)
अभिनेता विनोद थॉमस केरळमधील कोट्टायम येथील पंपाडी जवळील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “हॉटेल व्यवस्थापनातील एका व्यक्तीने आम्हाला ही माहिती दिली. विनोद हे येथील हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये बराच वेळ बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल होत त्यांना लगेच कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचवेळी त्याचं निधन झालं. दरम्यान, विनोद यांचे निधनाचे कारण अदयाप समोर आले नसून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.”
हे देखील वाचा – “माझ्या आईचं स्वप्नं होतं”, नवीन व्यवसायात उतरल्यानंतर आदर्श शिंदेची पोस्ट, म्हणाला, “त्याच्या एका वाक्यामुळे…”
Malayalam serial and movie actor vinod Thomas was found dead in his car outside a bar at Pambady near Kottayam yday evening. pic.twitter.com/XrPZWAO25V
— മുരളി (@muralewrites) November 18, 2023
दरम्यान, विनोद यांच्या मृत्यूबाबत असंही बोललं जातं की, कारमधील एसीमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अदयाप हे स्पष्ट झाले नसून शवविच्छेदनानंतरच त्यांच्या निधनाचे खरे कारण समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे देखील वाचा – ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट महिन्याला कमावतात इतके रुपये, एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी रक्कम
विनोद थॉमस यांनी बिजू मेनन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अयप्पनम कोशियुम’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात काम केले. ज्यात त्यांनी ‘स्टीफन’ ही भूमिका साकारली होती. याशिवाय ते ‘नाथोली ओरू चेरिया मीनल्ला’, ‘ओरू मुराई वंत पाथया’, ‘हॅपी वेडिंग’, ‘जून’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ते दिसले आहेत. दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कलाकार व चाहत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.