सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’च टीआरपीमध्ये पुढे, तर ‘आई कुठे…’वर प्रेक्षकांची नाराजी, ‘पारू’ मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 1, 2024 | 10:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Serial TRP Chart

‘ठरलं तर मग’च टीआरपीमध्ये पुढे, तर 'आई कुठे…'वर प्रेक्षकांची नाराजी, ‘पारू’ मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

प्रत्येक वाहिनीवर सुरु असणाऱ्या मालिकांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात. मालिकांच्या कथानकाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. मालिकांमध्ये येणारी रंजक वळणे साऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच मालिकांच्या टीआरपीमध्ये नेहमीप्रमाणे यावेळीही ‘ठरलं तर मग’ ही मालिका अव्वल ठरली आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. (Marathi Serial TRP Chart)

तर काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. कला व अद्वैतची मालिकेतील चुरशीची भांडण पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे. तर कला व अद्वैत एकत्र केव्हा येणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा अचानक टीआरपी घसरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या या मालिकेने आता चौथा क्रमांक गाठला आहे.

आणखी वाचा – अर्जुनने पुराव्यानिशी साक्षीला खोटं सिद्ध केलं, चैतन्यचाही राग अनावर, तर सायलीचा आनंद गगनात मावेना

View this post on Instagram

A post shared by #TRPTADKA (@marathitrptadka)

मालिकेत मुक्ता व सागर यांच्यातील प्रेमकथेत सावनीने मिठाचा खडा टाकल्याने प्रेक्षक नाराज असलेले दिसत आहेत. त्यामुळेच कदाचित मालिकेचा टीआरपी घसरला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सागर व मुक्ता कायमचे एकत्र यावेत अशी इच्छाही प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत. तर स्टार प्रवाह वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हा या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मात्र आता या मालिकेचा टीआरपी घसरला असून ही मालिका पहिल्या पाच क्रमांकातही नसल्याचं दिसतंय.

आणखी वाचा – आदित्यबरोबरच्या लग्नाचा पारू करणार खुलासा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देणार का?, मालिकेत काय घडणार?

तर गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायम टीआरपीमध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असलेली पाहायला मिळाली. मात्र आता ही मालिका अचानक टीआरपीमध्ये १५व्या क्रमांकावर आली आहे. मालिकेच्या कथानकावरही प्रेक्षक नाराज असलेले पाहायला मिळत आहे. तर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत हळूहळू वर येताना दिसत आहे. मालिकेवर व मालिकेच्या कथानकावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत.

Tags: entertainmentmarathi channelmarathi malikamarathi serialMarathi Serial TRP Chart
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Shivani Surve and Sameer Paranjpe, who were seen in the serial Devyani and Goth, will once again be seen in serial Thod Tuz Ani Thod Maz

'देवयानी' व 'गोठ' या मालिकांमधून गाजलेल्या कलाकारांचे कमबॅक, नव्या मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.