मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या खूप चर्चेत आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये त्या महत्तपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. त्यांच्या अभिनयाबरोबरच फिटनेसमुळेदेखील अधिक चर्चेत असलेल्या असतात. सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. व्यायाम करताना, जेवण बनवताना तसेच सेटवरील धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच आता त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी पितृपक्षात काय तयारी सुरु करण्यात आली आहे दिसून येत आहे. (aishwrya narakar viral video)
ऐश्वर्या या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या किचनमध्ये काम करताना दिसत आहेत. तसेच पितृपक्षामध्ये घारगे बनवताना दिसत आहेत. जेवण बनवताना त्या दिसत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.
चाहत्यांनी व्हिडीओला पसंती देत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओचे कौतुक केले असून एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्हाला असं काम करताना बघून आम्हाला कौतुक वाटत आहे”, तसेच एका नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया देत लिहिले की, “फक्त व्हिडीओपुरतं एकच घारगे बनवले ना तुम्ही?” त्यावर ऐश्वर्यायांनी देखील उत्तर देत म्हंटले की, “का बरं असं वाटतं तुम्हा लोकांना?” तसेच त्यावरच एका नेटकऱ्याने उत्तर देत लिहिले की, “घरच्या घरी बसून जजमेंट पण पास केलेत,वाह”. ऐश्वर्या यांच्या या उत्तराने नेटकऱ्यांची बोलती बंद झाली आहे.

दरम्यान सध्या ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या आता ‘सातव्या मुलीची…’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. सालस भूमिकेत दिसणाऱ्या ऐश्वर्या सध्या नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत. तसेच या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेमदेखील मिळत आहे.