मराठी अभिनेता शशांक केतकर हा सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. शशांक आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये दिसून आला आहे. त्याच्या सर्वच भूमिकांना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. मराठी चित्रपट व मालिकांबरोबरच तो हिंदी वेबसीरिजमध्येही दिसून आला आहे. अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असलेला बघायला मिळतो. अभिनयामध्ये निपुण असलेला शशांक सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय असतो. त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गमतीशीर प्रसंग असो किंवा सामाजिक हिताचे कोणतेही मत असो तो नेहमी सोशल मीडियावर बिनदिक्कतपणे मांडताना दिसतो. अशातच आता त्याच्या एका नवीन पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (shashank ketkar second child announcement)
शशांक २०१७ साली प्रियांका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांना ऋग्वेद नावाचा मुलगाही आहे. मुलाबरोबरचे अनेक फोटो व गमतीशीर व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बाप-लेकाचे गोड व्हिडीओ प्रेक्षकांच्या खूप पसंतीसही पडतात. अशातच आता शशांकने एक गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्याच्या घरी पुन्हा एकदा नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडियावर बायको व मुलाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये प्रियाका गरोदर असल्याचे दिसत आहे. शशांकने पोस्ट करत लिहिले की, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई-बाबा पुन्हा एकदा आजी-आजोबा व्हायला तयार झालो आहोत”.
दरम्यान या पोस्टमध्ये प्रियांका गरोदर दिसत असून तिने सुंदर असा गुलाबी रंगाचा वनपीस घातला आहे. तसेच केसात फुलदेखील दिसून येत आहे. शशांकनेदेखील गुलाबी रंगाची हुडी व कॅज्युअल पॅंट घातली आहे. त्याचप्रमाणे अजून दोन फोटोंमध्ये त्यांचा मुलगा ऋग्वेददेखील दिसून येत आहे. यामध्ये सगळेच खूप आनंदी असलेले दिसून येत आहेत. दऱम्याने शशांकच्या या पोस्टवर अभिनेत्री तीतिक्षा तावडे, आनंदी जोशी या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत शुभेच्छाही दिल्या आहेत.
या आधी म्हणजे डिसेंबर महिन्यात शशांक व प्रियांकाच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली. यावेळी त्याने बायकोसाठी सोशल मीडियावर खास पोस्टही शेअर केली होती. त्याने लिहिले की, “फक्त ७ वर्ष झाली. बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्यावरचं प्रेम आणि तू एका बाजूला”, असं कॅप्शन देत शशांकने त्याच्या बायकोबरोबरच्या आठवणी शेअर केल्या होत्या.