शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

३९ वर्ष बँकेत नोकरी, ६०व्या वर्षी सेवानिवृत्ती अन्…; ‘होणाऱ सून…’मधील शशीकला सध्या काय करते?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 28, 2025 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Honar soon me hya gharchi serial cast

होणाऱ सून...’मधील शशीकला सध्या काय करते?, जाणून घ्या त्यांचा प्रवास

‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील काही ठराविक संवाद प्रेक्षक विसरले नाहीत. ‘काहीही हा श्री’ हा संवाद तर अजरामर झाला असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. यामध्ये काम करणाऱ्या कित्येक कलाकारांनाही आज याच मालिकेमुळे ओळखलं जातं. एखाद्या कलाकृतीमुळे प्रेक्षकांनी आपल्याला ओळखणं हे फार कमी कलाकारांच्या वाट्याला येतं. ‘होणार सून मी ह्या घरची’मधील कलाकारांच्या वाट्याला हे सुख आलं. या मालिकेतील शशीकला हे पात्र सगळ्यांनाच आठवत असेल. अभिनेत्री आशा शेलार यांनी ही भूमिका उत्तम साकरली. त्यांच्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. (honar soon me hya gharchi actress asha shelar)

जान्हवीच्या (तेजश्री प्रधान) आईची भूमिका आशा यांनी साकारलेली. नकारात्मक भूमिका त्यांनी उत्तम पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. मालिका पाहताना प्रेक्षकांना चक्क शशीकलाचा नव्हे तर आशा यांचाच राग यायचा. ‘होणार सून मी ह्या घरची’ आशा यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला असला तरी त्यांनी आजवर बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. पण त्याचबरोबरीने त्यांनी बँकमध्ये नोकरी केली. याचबाबत त्यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात सांगितलं.

आणखी वाचा – अपघातानंतर परेश रावल प्यायचे स्वतःचीच लघवी, अभिनेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “बियरसारखी लघवी प्यायचो कारण…”

आशा म्हणाल्या, “बँक ऑफ इंडियामध्ये मी गेली ३९ वर्ष नोकरी केली. इंडस्ट्रीमधील बऱ्याच लोकांना याबाबत माहिती आहे. कधीतरी याचा फायदाही व्हायचा पण कधीतरी तोटाही. तोटा याच्यासाठी की, कोणतीही भूमिका असेल तर आशाताईंची नोकरी आहे ना कशाला? असं व्हायचं. हे होणं स्वाभाविकच आहे कारण मी नोकरी करत आहे. आता काही दिवसांपूर्वीच मी सेवानिवृत्ती घेतली आहे. यावरुनच तुम्हाला समजलं असेल की, आता मी ६० वर्षांची आहे”.

आणखी वाचा – “’छावा’ माझ्यामुळे चालला असं विकीने बोलूच नये आणि…”, महेश मांजरेकरांचं बेधडक वक्तव्य, हिंदी चित्रपटांची परिस्थिती…

“आता मी इंडस्ट्रीत नव्या जोमाने काम करण्यास तयार आहे. माझ्या आवाजाला, लूकला, न्याय देणारी भूमिका मी करु शकते. अर्थात २२ २३ वर्षांच्या तरुणीची भूमिका आता मला मिळणार नाही. पण त्याच तरुणींच्या आई, सासूची भूमिका मी साकारु शकते. या भूमिका सध्या काळाची गरज आहेत. लोकांना मी आवडते हे मी स्वतःच सांगेत”. एकूणच काय तर आशा शेलार लवकरच मालिकांमध्ये काम करताना दिसतील यांत शंका नाही.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Atul Kulkarni Visit Pahalgam

दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये पोहोचले अतुल कुलकर्णी, जिथे घटना घडली तिथेच गेले अन्…; म्हणाले, "काश्मीरला येणारच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.