मराठी मनोरंजनक्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहेरेचं नाव घेतलं जातं. आजवर प्रार्थना अनेक मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचीदेखील खूप पसंती मिळते. मात्र सध्या प्रार्थनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रार्थनाच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिची एक भावनिक पोस्ट समोर आली आहे. यामध्ये तिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याचे सांगितले आहे. ही व्यक्ती म्हणजे तिचा भाऊ. प्रार्थनाची ही भावुक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (prarthna behere brother passed away)
प्रार्थनाने भावाच्या निधनानंतर भावाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “लव्ह यू पिंटू. तुझी नेहमी आठवण येत राहील. तू असा अचानक निघून गेलास. आपण एकमेकांना व्यवस्थित बायदेखील म्हणालो नाही. पण भाऊ कधीही लांब जात नाही. आपल्या चांगल्या आठवणी नेहमी स्मरणात राहतील. तुझ्या आत्म्यास शांती मिळो. आपण पुढच्या जन्मात एकमेकांना भेटू” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
प्रार्थनाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला असून तिला खंबीर राहण्यास सांगितले आहे. प्रार्थनाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.प्रार्थनाने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हाट्सॲप लग्न’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना आपलसं केलं. त्याचबरोबर हिंदी चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
मात्र, लग्नानंतर प्रार्थना चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही. पुढे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. मात्र, चाहते व प्रेक्षक तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड आतुरलेले आहेत. आता ती कोणत्या चित्रपटात दिसून येणार आहे? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.